पारेगाव रस्त्याची चाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2021 05:28 PM2021-08-04T17:28:17+5:302021-08-04T17:28:49+5:30
मानोरी : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांचा मतदार संघातील चांगल्या रस्त्यांची तुलना सर्वत्र होत असते. येवला पारेगाव निमगाव या रस्त्याची अवस्था मागील दहा वर्षांपासून अतिशय दुर्दैवी दुरवस्था झाली असून खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डा हा प्रश्न रस्त्याने रहदारी करणाऱ्या वाहन चालकांना आणि प्रवाशांना पडला आहे.

येवला पारेगाव निमगाव या रस्त्याने दररोज हजारो नागरिक व शेतकरी बाजारात कृषिमाल याच रस्त्याने घेऊन जात असतात. पारेगाव मधून येवल्याला जाताना रस्त्यावर गुडघाभर खड्डे असून या खड्ड्यातून रुग्णवाहिकेला रुग्ण घेऊन ये-जा करताना रोज अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या खड्ड्यात पडून अपघात घडण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढत चालले आहे.
संबंधित विभागाने खड्डे त्वरित बुजवावे कारण या खड्यात पावसाचे पाणी साचत असल्याने त्या खड्यंचा अंदाज येत नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहेत. तसेच येवला ते निमगाव हा संपूर्ण रस्ता डांबरीकरण करून वाहतूक योग्य करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी करीत आहे.