विद्यार्थ्यांच्या आॅनलाईन शिक्षणसाठी पालकांचे तहसीलदारांकडे साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 03:21 PM2020-09-07T15:21:22+5:302020-09-07T15:21:59+5:30
कंधाणे : बागलाण तालुक्यातील एका खाजगी शिक्षण संस्थेने चालू शैक्षणिक वर्षाची फि भरण्यासाठी सक्ती केली असुन फी न भरल्याने अनेक विद्यार्थ्यांना गेल्या तीन आठवड्यांपासून आॅनलाईन शिक्षणापासुन वंचित ठेवले जात असल्याने सोमवारी(दि.७)लोकशाही दिनी तहसीलदारांना निवेदन देण्यातआले.

बागलाण तालूक्यातील या शाळेने चालु शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्क आकारणीचा तगादा लावला आहे. शैक्षणिक शुल्क न भरल्यास संस्थेकडून चालू असलेल्या आॅनलाईन शिक्षणाला मुकावे लागेल असा निर्णयघेतला आहे.गेल्या दोन दिवसापूर्वी फी बाकीचे चे कारण देत आॅनलाईन शिक्षण बंद केले आहे. आगामी वर्षाची फी जमा करण्याची सक्ती करू नये असे असताना या शाळेची शैक्षणिक शुल्क भरण्याची सक्ती का? असा सवाल यावेळी उपस्थितांनी संबंधितांना विचारणा केली. अखेर गटशिक्षणाधिकारी यांची भेट गाठत घेत मागणीचे निवेदन सादर केले. मात्र तालुकास्तरावर योग्य कार्यवाही न झाल्याने पालकांनी शिक्षण उपसंचालक यांची भेट घेतली. पण अदयाप पर्यंत अपेक्षीत कार्यवाही न झाल्याने सोमवारी लोकशाही दिनी पालकांनी बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे यांची भेट घेत पाल्यांच्या आॅनलाईन शिक्षणाचे दरवाजे उघडावेत अशी मागणी केली आहे.
संबधित शाळेने शासन आदेशाला केराची टोपली दाखवत शैक्षणिक शुल्क भरण्याची सक्ती केली असुन फी न भरल्याने अनेक विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिक्षणाला मुकावे लागत आहे. संबधितांवर योग्य कार्यवाही करून आमच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे.
- पुनम पाटील, पालक, सटाणा.