पालकांकडून होतोय सिंगल चाइल्डचाच विचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:11 AM2021-07-11T04:11:50+5:302021-07-11T04:11:50+5:30
नाशिक : वाढती लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी योगदान आवश्यक असून त्यासाठी विविध माध्यमातून जनजागृती होत असली तरी जनसामान्यांच्या ...
नाशिक : वाढती लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी योगदान आवश्यक असून त्यासाठी विविध माध्यमातून जनजागृती होत असली तरी जनसामान्यांच्या प्रतिसाद मिळणे त्यासाठी आवश्यक आहे. नाशिकमधील अनेक पालक यादृष्टीने सकारात्मक विचार करू लागले असून, त्यांनी सिंगल चाइल्डचाच विचार करण्यास सुरुवात केली आहे.
रोजगार निर्मितीतली घट आणि त्यामुळे वाढणारी बेरोजगारी याच्या चक्रात ‘डेमोग्राफिक डिव्हिडंड’ अडकला आहे. परिणामी वाढत्या लोकसंख्येचा ‘लाभ’ होण्याऐवजी त्याचे ‘ओझे’ वाटण्याचीच शक्यता अधिक आहे. ही स्थिती बदलण्याचे आव्हान सरकारसमोर आहे. त्यामुळेच सरकारकडून सिंगल गर्ल चाइल्डसाठी विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. जगातील विकसनशील देशांसमोर लोकसंख्या वाढीची मोठी समस्या देशाच्या प्रगतीतील अडसर म्हणून समोर येत असल्याने वाढती लोकसंख्या ही चिंताजनक बाब बनली आहे. त्यामुळे मुलांना उत्तम शिक्षण देऊन त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पालकांनी कुटुंब नियोजनाचा पालक गांभीर्याने विचार करीत आहेत.
इन्फो-
वाढत्या लोकसंख्येसोबत शिक्षण, आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधांचा तुटवडा निर्माण होत असून, सातत्याने वाढत असलेली महागाईच्या काळात त्याचा मुलांच्या पालन पोषणावर परिणाम होतो. ही बाब टाळण्यासाठी सिंगल चाइल्डचा विचार करणे अनिवार्य झाले आहे.एका पेक्षा अधिक मुलांचा विचार करून त्यांच्या पालनपोषणाच्या खर्चाचा ताण निर्माण करण्यापेक्षा मिळणाऱ्या उत्पन्नात एकाच मुलाचे अथवा मुलीचे उत्कृष्ट संगोपन आणि त्याला दर्जेदार सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावर लक्ष केंद्रित केल्याचे एकाच मुलीवर कुटुंब नियोजनाचा निर्णय घेणाऱ्या गृहिणीने सांगितले.
इन्फो-
वाढत्या लोकसंख्येचे दुष्परिणाम
बेरोजगारी : लोकसंख्या वाढल्याने लोक रोजगाराच्या शोधात वेगवेगळ्या शहरांकडे वळू लागले. नोकरीच्या संधी कमी झाल्याने बेरोजगारी वाढूही लागली. परिणामी गरिबीमध्येही झपाट्याने वाढ होऊ लागली. साधनसंपत्तीची कमतरता भासू लागली.
रोगराई : वाढत्या लोकसंख्येमुळे आरोग्याच्या सोयीदेखील अपुऱ्या पडू लागल्या. साथीचे रोग मोठ्या प्रमाणात पसरू लागल्याचे कोरोना संकटात समोर आले आहे. दाट लोकसंख्या असलेल्या मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबादसह नाशिकमध्येही आरोग्य सेवा कोलमडल्याचे दिसून आले. कमी लोकसंखेच्या देशांमध्ये कोरोनावर नियंत्रण करणे तुलनेत सोपे गेल्याचेही जगाने अनुभवले आहे.
लोकसंख्येचा डेटा : जनगणनेसोबत विविध माध्यमांद्वारे लोकसंख्येविषयी डेटा जमवला जातो. उदाहरणार्थ स्त्री-पुरुष संख्येचे गुणोत्तर, जन्मदर, मृत्युदर, आरोग्य आदी या सर्व माहितीचा देशाच्या नियोजनासाठी उपयोग होतो. वाढत्या लोकसंख्येमुळे असा डेटा संकलनात मोठ्या प्रमाणात अडचणी येतात. अनेक कुटुंबांना निवारा उपलब्ध होऊ शकत नाही. अशा भटक्या कटुंबांची माहिती संकलित होऊ शकत नसल्याने त्यांना पायाभूत सुविधांपासूनही वंचित राहावे लागते.