सर्वशिक्षाच्या योजनेतील बदलांमुळे पालकांनाच करावी लागणार पाठय़पुस्तकांची खरेदी, आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांची अडचण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 05:06 PM2017-10-29T17:06:31+5:302017-10-29T17:22:11+5:30

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणा:या मोफत पाठय़पुस्तक योजनेत पुढील शैक्षणिक वर्षापासून बदल होणार असून, यापुढे विद्यार्थ्यांना थेट पाठय़पुस्तकांऐवजी त्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा केले जातील

 Parents need to make changes due to the changes in the Sarva Siksha Yojana; | सर्वशिक्षाच्या योजनेतील बदलांमुळे पालकांनाच करावी लागणार पाठय़पुस्तकांची खरेदी, आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांची अडचण होणार

सर्वशिक्षाच्या योजनेतील बदलांमुळे पालकांनाच करावी लागणार पाठय़पुस्तकांची खरेदी, आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांची अडचण होणार

googlenewsNext
ठळक मुद्देसर्वशिक्षा च्या पाठ्य पुस्तक योजनेत बदलआर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांची अडचण होणारविद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्यही धोक्यात येण्याची शक्यता

नाशिक : सर्वशिक्षा अभियानांतर्गत अनुदानित शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मोफत पाठय़पुस्तक योजनेत पुढील शैक्षणिक वर्षापासून बदल होणार असून, यापुढे विद्यार्थ्यांना थेट पाठय़पुस्तकांऐवजी त्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा केले जातील. यासाठी जिल्ह्यातील 5 लाख 45 हजार 382 लाभार्थ्यांना राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडणे अनिवार्य झाले आहे.
खासगी अनुदानित, आश्रमशाळा, समाजकल्याण विभागामार्फत ग्रामीण व शहरी भागातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत पाठय़पुस्तके पुरविली जातात. त्याऐवजी आता विद्यार्थ्यांना थेट खात्यावर पैसे देण्याच्या सूचना शिक्षण विभागाला देण्यात आल्या आहेत. शिक्षण विभागाने जिल्ह्यातील पात्र शाळांना सूचना देऊन विद्यार्थ्यांचे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्याची सूचना दिली असून, विद्यार्थ्यांना त्यासाठी आई-वडील अथवा पालकांसोबत राष्ट्रीयीकृत बँक किंवा ग्रामीण बँक, पोस्ट खाते क्रमांक, शेडय़ुल्ड बँकेत खाते उघडावे लागणार आहे. अगोदर पुस्तके खरेदी करून बिल मुख्याध्यापकांना सादर केल्यानंतरच विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जातील. त्यामुळे पालकांना अगोदर पैसे खर्च करावे लागतील, त्यानंतर त्यांना पैसे मिळणार असल्याने या निर्णयाविषयी नाराजीचा सूर आहे. ग्रामीण भागार्पयत पाठय़पुस्तके पोहोचविणे, वाहनांची उपलब्धता, हिशेब करण्यार्पयत सर्वच कामांमध्ये प्रत्येक शाळेमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्याचा मोठा वेळ खर्ची होतो. त्यामुळे ही योजना निश्चितपणे यशस्वी होईल, असा विश्वास शिक्षण विभागाला वाटत असला तरी पुस्तकांचे पैसे वेळीच मिळणो व ते पुस्तकांसाठीच खर्च होतात की नाही, हे तपासण्याचे आव्हान शिक्षण विभागापुढे निर्माण झाले आहे. असे झाले नाही, तर आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्यही धोक्यात येण्याची शक्यता शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

 

Web Title:  Parents need to make changes due to the changes in the Sarva Siksha Yojana;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.