पालक सचिवांचा शेतकऱ्यांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 10:45 PM2019-05-16T22:45:14+5:302019-05-16T22:45:40+5:30
सिन्नर/गुळवंच : सिन्नर तालुक्याची दुष्काळी परिस्थिती व त्यावर मात करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी जिल्हाचे पालक सचिव सीताराम कुंटे यांनी दौरा केला. गुळवंच येथील चारा छावणीला भेट देण्यासह जलयुक्तच्या व पानी फाऊंडेशनच्या कामांची पाहणी पालक सचिवांनी केली. गुळवंच येथील चारा छावणीतील शेतकऱ्यांसोबत संवाद साधून त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतला. दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता जनावरांच्या छावणीला मुदतवाढ देण्याबाबतचा अहवालावर त्यांनी सकारत्मकता दर्शविली.
सिन्नर/गुळवंच : सिन्नर तालुक्याची दुष्काळी परिस्थिती व त्यावर मात करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी जिल्हाचे पालक सचिव सीताराम कुंटे यांनी दौरा केला. गुळवंच येथील चारा छावणीला भेट देण्यासह जलयुक्तच्या व पानी फाऊंडेशनच्या कामांची पाहणी पालक सचिवांनी केली. गुळवंच येथील चारा छावणीतील शेतकऱ्यांसोबत संवाद साधून त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतला. दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता जनावरांच्या छावणीला मुदतवाढ देण्याबाबतचा अहवालावर त्यांनी सकारत्मकता दर्शविली.
पालक सचिव सीताराम कुंटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते, उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ, अर्जून श्रीनिवास, जिल्हा कृषी अधीक्षक एस. जी. पडवळ, प्रांताधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार राहुल कोताडे, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, कृषी अधिकारी गोकुळ वाघ, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. विसावे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. गर्जे, तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. मिलिंद भणगे, तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब घागरे, यांच्यासह कृषी, रोजगार हमी, महसूल, पंचायत समितीचे
अधिकारी यांच्यासह तालुक्यात दौरा केला.
गुळवंच येथील छावणीत शेतकºयांनी शेतकºयांनी जनावरांना मुबलक पाणी-चारा उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी
केली.
त्याचबरोबर प्रत्येक जनावरांना देण्यात येणाºया अनुदानात वाढ करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी कुंटे यांनी जनावरांना दहा रूपयांची वाढ करण्यात आली असल्याचे सांगितले. तसेच परिसरातून दुपारी दोन वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात जनावरे या छावणीत दाखल होत असल्याचे कुंटे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी खोपडी येथील दराडे यांच्या समवेत संवाद साधत जेवन कुठून येणार? दुभती जनावरे किती राहण्याची सोय काय अशी चौकशी करत छावणी धारकांना याबाबत लक्ष देण्याची सूचना केली.
दराडे हे दहा जनावरांसह येथे स्वत: मुक्काम करणार आहे. छावणी चालकांना वेळेत पैसे द्या अशी सूचना संबंधित अधिकाºयांना करण्यात आल्या. यावेळी विष्णू सानप, अर्जुन आव्हाड, भगवान सानप, प्रकाश सानप सरपंच कविता सानप, उपसरपंच सुनिता कांगणे, भाऊदास सिरसाठ, केशव कांगणे, संतोष कांगणे, अनिल कानडे आदि उपस्थित होते.कुंदेवाडी, डुबेरे व आशापूर येथे भेटजिल्हा पालक सचिव कुंटे यांनी कुंदेवाडी येथे गाळमुक्त धरण अभियान कामाची पाहणी केली. गाळ काढणे व दुरुस्तीच्या कामाची माहिती त्यांनी घेतली. डुबेरे येथील फळबागेला भेट देत कमी पाण्यात फळबाग वाचविण्यासाठी करण्यात येणाºया उपाययोजनांची माहिती घेतली. आशापूर येथे पानी फाऊंडेशनच्या श्रमदानाची माहिती कुंटे यांनी घेतली. वाजे यांचे निवेदनपालक सचिव कुंटे यांची डुबेरे येथे आमदार राजाभाऊ वाजे यांच्याशी भेट झाली. यावेळी वाजे यांनी तालुक्यातील टंचाईची स्थिती सांगून दुष्काळी उपाययोजनांच्या मागण्यांचे निवेदन दिले. विधानसभेत दोन वर्षांपूर्वी जनावरांसाठी पाणी, प्रतिमाणसी देण्यात येणारे पाणी, जनावरांना देण्यात येणारा अपुरा असून निकष बदलण्याची मागणी केली होती असे सांगितले. तथापि, अद्यापही निर्णय झाला नाही़रजिस्टरची पाहणीपालकसचिव कुंटे यांनी गुळवंच येथे ग्रामपंचायतीत असलेल्या टॅँकरचे रजिस्टर पाहून खातरजमा केली. टॅँकरच्या फेºयांची माहिती जाणून घेण्यासह टंचाईच्या स्थितीचा आढावा त्यांनी घेतला. याबाबत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली़पालक सचिवांचा पीकअप जीपमधून प्रवासपालक सचिव सीतारा कुंटे यांनी आशापूर (टेंभूरवाडी) येथे पानी फाऊंडेशनचे श्रमदानातून करण्यात येणारे काम पाहिले. भर उन्हात शासकीय वाहने कामाची ठिकाणी जात नसल्याने पीकअप जीपमधून पुढील प्रवास करण्याचा निर्णय कुंटे यांनी घेतला. भर उन्हात उघड्या पीकअप जीपमधून डोक्यावर उपरणे बांधून कुंटे यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते, तहसीलदार राहुल कोताडे, गटविकास अधिकारी लता गायकवाड यांनी कामाचे ठिकाण गाठून पाहणी केली.