सिडकोतील उद्यानेही बनली नशाखोरांचा अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:14 AM2021-08-01T04:14:05+5:302021-08-01T04:14:05+5:30
कोरोना महामार्गामुळे सिडको भागातील बहुतांशी उद्याने महापालिकेने बंद ठेवली आहेत, तर काही उद्याने दुपारी चार वाजेपर्यंत सुरू आहेत. परंतु ...
कोरोना महामार्गामुळे सिडको भागातील बहुतांशी उद्याने महापालिकेने बंद ठेवली आहेत, तर काही उद्याने दुपारी चार वाजेपर्यंत सुरू आहेत. परंतु सध्या या उद्यानाचा ताबा टवाळखोरांनी तसेच अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांनी घेतला आहे. या उद्यानात मद्यपानसह नशा करणे असे प्रकार करून उद्यानात व परिसरात धिंगाणा घातला जात आहे. सिडकोतील गणेश चौक येथे महापालिकेचे गणेश चौक मिनी गार्डन असून या उद्यानातही असाच प्रकार बाहेरून येणाऱ्या टवाळखोरांकडून सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच याच ठिकाणी उद्यानाच्या जवळच एका तरुणाचा खून झाल्याची घटना घडलेली आहे. असे असतानाही या उद्यानाकडे महापालिकेने संपूर्ण दुर्लक्ष केले आहे. परंतु पोलीस प्रशासनानेही याकडे पाठ का फिरवली, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. जुने सिडको येथील बाळासाहेब ठाकरे उद्यान, शिवशक्ती चौक येथील गोपीनाथ मुंडे उद्यान यासह सिडको व अंबड भागातील उद्यानामध्ये टवाळखोरांचा उपद्रव वाढल्याच्या तक्रारी आहेत. या परिसरातून महिला व नागरिकांना ये-जा करणेदेखील कठीण होत आहे. नशाखोर परिसरात दहशत पसरवीत असून, यामुळे सिडको व अंबड भागातील उद्यानांमध्ये सर्वसामान्य नागरिकांनी न जाणे पसंत केल्याचे दिसून येत आहे.
चौकट===
महापालिकेच्या सिडको विभागीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे उद्यानातील टवाळखोरांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पोलीस प्रशासनाबरोबरच महापालिकेनेदेखील या ठिकाणी सुरक्षारक्षक ठेवून उद्यानाची देखभाल करणे अपेक्षित असताना मात्र अनेक उद्यानामध्ये सुरक्षारक्षकच नसल्याने उद्यानात टवाळखोरांचा वावर तसेच उद्रेक दिवसेंदिवस वाढत आहे.
(फोटो ३१ सिडको)