कृष्णकांत भाजीमार्केटला वाहनतळाची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:35 AM2019-04-29T00:35:57+5:302019-04-29T00:36:30+5:30
कलानगर येथील कृष्णकांत भाजीमार्केटला वाहनतळाची सोय नसल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. तातडीने वाहनतळाची सोय करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
इंदिरानगर : कलानगर येथील कृष्णकांत भाजीमार्केटला वाहनतळाची सोय नसल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. तातडीने वाहनतळाची सोय करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
कलानगर परिसरात सुमारे वीस ते पंचवीस वर्षांपासून भाजीमार्केट नसल्याने भाजीविक्रे ते सर्रासपणे रस्त्यावर बसत होते. इंदिरानगरमधील मध्यवर्ती सावरकर चौक ओळखला जातो. वडाळा-पाथर्डी रस्त्यावर असलेला सावरकर चौक ते राजसारथी सोसायटी या रस्त्याच्या दुतर्फा भाजीविक्रेते बसत असे. त्यामुळे त्यांच्याकडे येणारे ग्राहक सर्रासपणे रस्त्यावर वाहने उभी करीत होती. त्यामुळे वडाळा-पाथर्डी रस्त्यावरून मार्गक्र मण करणाऱ्या वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत असे. त्यातूनच दररोज लहान-मोठ्या अपघातांच्या घटना घडत होत्या. तसेच पादचाऱ्यांना मार्गक्र मण करणेसुद्धा मुश्किल झाले होते. त्रस्त नागरिकांनी रस्त्यावरील भाजीबाजार हटवण्याची मागणी केली असता त्याची दखल घेत सुमारे १५ वर्षांपूर्वी महापालिकेच्या वतीने कलानगर येथे कृष्णकांत भाजीबाजार बांधण्यात आला. यामध्ये सीमेंटची ओटे बांधून यावर सुमारे ७५ भाजीविक्रे ते व्यवसाय करू शकतील, अशी सोय करण्यात आली आहे. तसेच पाऊस व उन्हापासून बचाव होण्यासाठी पत्र्याचे शेड टाकण्यात आले. आज त्या ठिकाणी सुमारे ४५ भाजीविक्री व्यवसाय करतात. सायंकाळी परिसरातील मोठ्या प्रमाणात नागरिक भाजी खरेदी करण्यासाठी येतात. परंतु या ठिकाणी वाहनांची सोय नसल्याने भाजीबाजाराच्या बाहेर असलेल्या कॉलनी रस्त्यावरच सर्रासपणे वाहने लावली जातात. कलानगरमध्ये जाणाºया वाहनधारकांना व पादचाºयांना मार्गक्र मण करताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यातूनच लहान-मोठे अपघात होऊन हमरीतुमरीच्याही घटना घडत आहे.
परिसरातील नागरिक त्रस्त
कृष्णकांत भाजीबाजाराच्या चारही बाजूने रो-हाउसेस व अपार्टमेंट आहेत. या ठिकाणी वाहनांची सोय नसल्याने भाजीबाजाराच्या बाहेर असलेल्या कॉलनी रस्त्यावरच सर्रासपणे वाहने लावली जातात. त्या ठिकाणी येणारी वाहने कॉलनी रस्त्यावर लागत असल्याने परिसरातील नागरिकांना घराच्या बाहेर निघणे तसेच वाहने काढणेसुद्धा मुश्किल झाले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.