बसस्थानक परिसरात पार्किंगचा फज्जा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:16 AM2021-02-25T04:16:12+5:302021-02-25T04:16:12+5:30
भलेवाडीतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य सिन्नर : तालुक्यातील ठाणगावजवळील भलेवाडी प्राथमिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. नामदेव ...
भलेवाडीतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य
सिन्नर : तालुक्यातील ठाणगावजवळील भलेवाडी प्राथमिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. नामदेव काकड व निर्मला काकड यांनी सदरचा उपक्रम राबविला. बाजार समितीचे माजी सभापती नामदेव शिंदे यांच्या हस्ते चाळीस विद्यार्थ्यांना साहित्य वाटप केले.
पवार यांचे स्पर्धा परीक्षेत यश
सिन्नर : तालुक्यातील वावी पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी विठ्ठल रामनाथ पवार यांनी कर्तव्य बजावत असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा दिली. परीक्षेत ४००पैकी ३६० गुण मिळवून राज्यात १७४वा व नाशिक जिल्ह्यात प्रथम येण्याचा त्यांनी मान मिळवला. त्यामुळे पवार यांनी पीएसआयपदाला गवासणी घातली.
सिन्नर महाविद्यालयात अस्मिता नियतकालिक
सिन्नर : येथील महाविद्यालयात अस्मिता नियतकालिकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. महाविद्यालयात नियतकालिक हा स्तुत्य उपक्रम आहे. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी या व्यासपीठाचा उपयोग करून जलचिंतन या विषयावर माहिती संकलित केली होती.
नांदूर विद्यालयास कोरोना कीट
नांदूरशिंगोटे : येथील विद्यालयात नाशिक येथील निरामय रुग्णालयाकडून कोरोना प्रतिबंधक कीट देण्यात आले. डॉ. मारूती घुगे व डॉ. हेमंत साबळे यांनी सदरचा उपक्रम राबविला. प्राचार्य बी. आर. खैरनार यांच्याकडे साहित्य सुपूर्द करण्यात आले.