आठवडे बाजारानजीक रस्त्यावरच पार्किंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:41 AM2019-04-29T00:41:15+5:302019-04-29T00:42:20+5:30
: परिसरातील गंगाघाट, हिरावाडी तसेच अयोध्यानगरी भागात बुधवारी, सोमवारी व शनिवारी भरणाऱ्या आठवडे बाजाराच्या दिवशी वाहने उभी करण्यासाठी अधिकृत जागा नसल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होते.
पंचवटी : परिसरातील गंगाघाट, हिरावाडी तसेच अयोध्यानगरी भागात बुधवारी, सोमवारी व शनिवारी भरणाऱ्या आठवडे बाजाराच्या दिवशी वाहने उभी करण्यासाठी अधिकृत जागा नसल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होते. यामुळे थेट बाजारात वाहने घुसविली जातात, तर अनेकदा रस्त्यावरच पार्किंग करण्याची वेळ ग्राहकांवर येते.
बुधवारच्या दिवशी गंगाघाटावर सोमवारी हिरावाडी कमलनगर, तर शनिवारच्या दिवशी अयोध्यानगरी भागात आठवडे बाजार भरतो. या बाजारात किराणामाल भाजीपाला तसेच अन्य वस्तू खरेदीसाठी शेकडो ग्राहक येत असतात. अत्यंत दाटीवाटीने विक्रे ते भाजीबाजारात बसत असल्याने रस्त्याने पायी चालणेदेखील अवघड होते. भाजीपाला खरेदी करण्यासाठी येणारे नागरिक दुचाकी घेऊन येतात; मात्र त्यावेळी दुचाकी उभ्या करण्यासाठी वाहनतळ असल्याने दुचाकी कुठे उभ्या करायचा? असा मोठा प्रश्न निर्माण होतो. गंगाघाटावर बुधवारी भरणाºया आठवडे बाजाराच्या दिवशी बाजारात आलेल्या नागरिकांना दुकानांसमोर, तर कधी खाद्यपदार्थ विक्री करणारे हातगाड्यांसमोर दुचाकी उभ्या कराव्या लागतात.
त्यामुळे अनेकदा खाद्यपदार्थ विक्री करणारे काही हातगाडीचालक नागरिकांशी वाद घालतात. बुधवारच्या बाजारात खाद्यपदार्थ विक्री करणाºया हातगाडीचालकांनी अतिक्र मण केल्याने वाहनतळाची समस्या निर्माण होते अशी तक्रार नागरिकांची आहे. अशीच परिस्थिती दर सोमवारी भरणाºया हिरावाडी कमलनगर येथील भाजीबाजाराची आहे. भाजीपाला खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांना वाहने उभी करण्यासाठी जागाच नसल्याने मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावरच वाहने उभी केली जात असल्याचे चित्र बघायला मिळते. याबाबत कारवाईची मागणी होत आहे़
वाहनतळ उभारण्याची मागणी
दिंडोरीरोड तसेच पेठरोड परिसरातदेखील दैनंदिन भाजीबाजार भरतो रस्त्याच्या बाजूलाच भरणाºया भाजीबाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांना भर रस्त्यातच वाहने उभी करावी लागतात. त्यामुळे अनेकदा अपघात होण्याची शक्यता निर्माण होते. भाजीबाजारामुळे वारंवार वाहतुकीची कोंडी होत असते. त्यामुळे या ठिकाणी वाहनतळ उभारण्याची मागणी होत आहे़