१२ हजार विद्यार्थ्यांची भाग दोन प्रक्रिया पूर्ण

By admin | Published: June 20, 2017 01:35 AM2017-06-20T01:35:23+5:302017-06-20T01:35:41+5:30

अकरावी : आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया

Part two of 12 thousand students complete the process | १२ हजार विद्यार्थ्यांची भाग दोन प्रक्रिया पूर्ण

१२ हजार विद्यार्थ्यांची भाग दोन प्रक्रिया पूर्ण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : अकरावी आॅनलाइन प्रवेशप्रक्रियांतर्गत आत्तापर्यंत सुमारे १२ हजार २१ विद्यार्थ्यांनी भाग दोन भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली असून, भाग एकमधील प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २६ हजार ४० पर्यंत पोहोचली आहे. यातील काही विद्यार्थ्यांनी भाग एकची पडतळणी करून न घेताच भाग दोन भरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना अडचणी येत असून, ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत अडचण निर्माण होत आहे, त्यांनी संबंधित भागासाठी नियोजित मार्गदर्शन केंद्रावर संपर्क साधण्याचे आवाहन शिक्षण उपसंचालक कार्यालयाने केले आहे.
अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी काही विद्यार्थी थेट भाग दोन भरण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा विद्यार्थ्यांना भाग १ ची प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय भाग दोन भरता येणार नाही. तर पुनर्परीक्षा देणारे विद्यार्थी त्यांच्या गुणपत्रिकांमधील माहिती भरताना चुका करीत असल्याने त्यांनी शाळा, महाविद्यालयांमधील सुविधा केंद्र अथवा मार्गदर्शन कें द्रावर संपर्क साधून अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज असल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांनी माहिती पुस्तिकांचा सखोल अभ्यास करून प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. प्रयत्न करूनही विद्यार्थ्यांना अडचण येत असल्यास त्यांनी मार्गदर्शन केंद्रावरून मदत मिळवून अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली आहे. दरम्यान, आतापर्यंत २६ हजार ४० विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जातील भाग १ भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली असून, त्यापैकी २२ हजार ७०६ विद्यार्थ्यांच्या अर्जांची कनिष्ठ महाविद्यालये अथवा शाळास्तरावर पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अर्जाची पडताळणी करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत १२ हजार २१ विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेचा भाग दोन भरण्याची प्रक्रियाही पूर्ण केली आहे. मंगळवारी प्राचार्यांची बैठकअकरावीच्या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेतील दुसरा टप्पा पूर्ण करण्यासाठी शहरातील कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालयांच्या प्राचार्यांची नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात बैठक बोलाविण्यात आली आहे. यावेळी प्राचार्यांना अल्पसंख्याक, इनहाउस, तंत्रशिक्षण व व्यवस्थापन कोट्याच्या आरक्षणांनुसार प्रवेशप्रक्रिया राबविण्याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

Web Title: Part two of 12 thousand students complete the process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.