अर्धवट बांधकामाचा स्लॅब कोसळून नाशिकमध्ये तीघे गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 10:36 PM2018-06-07T22:36:46+5:302018-06-07T22:36:46+5:30

वादळी वाऱ्यासह गुरूवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. मध्यरात्रीच्या सुमारास अचानकपणे शहरासह उपनगरीय भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरामध्ये अवघ्या तासाभरात ३६ मि.मी इतका पाऊस पडला.

The partial construction slab collapsed in Nashik, the tiger is serious | अर्धवट बांधकामाचा स्लॅब कोसळून नाशिकमध्ये तीघे गंभीर

अर्धवट बांधकामाचा स्लॅब कोसळून नाशिकमध्ये तीघे गंभीर

Next
ठळक मुद्देसुदैवाने तीघांचे प्राण वाचले. तीघा जखमींना मलब्याखालून सुरक्षित बाहेर काढण्यास यश आले

नाशिक : गुरूवारी (दि.७) मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसाने पंचवटीमधील फुलेनगर परिसरातील एका अर्धवट स्थितीतील बांधकाम असलेल्या घराचा स्लॅब कोसळून तीघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. स्लॅबच्या मलब्याखाली अडकलेल्या तीघा पुरूषांना अग्निशामक दलाचे जवान व पोलिसांनी आपत्कालीन मदतकार्य करुन रेस्क्यू केले. सुदैवाने तीघांचे प्राण वाचले.
वादळी वाऱ्यासह गुरूवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. मध्यरात्रीच्या सुमारास अचानकपणे शहरासह उपनगरीय भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरामध्ये अवघ्या तासाभरात ३६ मि.मी इतका पाऊस पडला. दरम्यान, फुलेनगरमधील एका अर्धवट स्थितीत असलेल्या घराचे बांधकामामध्ये दोन भींतींच्या आधारे टाकण्यात आलेला स्लॅब वादळी वारा व पावसाने कोसळला. हे घर संगीता गोपाळ गायकवाड यांच्या मालकीचे असून अर्धवट बांधकामाचा आधार घेत फुलेनगरमधील शनिचौकात या घरामध्ये श्याम (पुर्ण नाव नाही समजले नाही) सोमनाथ भवर (४०) सुरेश नारायण जाधव (२८) हे मोलमजूरी करणारे कामगार आश्रयाला होते. दरम्यान, ते बसलेले असताना अचानकपणे पावसामुळे वरील स्लॅब कोसळला आणि स्लॅबच्या मलब्याखाली तीघे अडकले. दैव बलवत्तर असल्यामुळे तीघांचे या दुर्घटनेत प्राण वाचले. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, तोपर्यंत परिसरातील बघ्यांच्या गर्दीचा मोठा जमाव घटनास्थळी जमलेला होता. पंचवटी अग्निशामक उपकेंद्राचे जवान घटनास्थळी पोहचले. इलेक्ट्रॉनिक कटर, स्पॅनरच्या सहाय्याने लिडिंग फायरमन विलास डांगळे, उमेश झिटे, महेंद्र सोनवणे, सोमनाथ पगार, संतोष भालेराव आदिंनी ढिगारा हटविला. दरम्यान, काही पोलिसांनीही जवानांना आपत्कालीन कार्यात मदत केली. जलद प्रतिसाद पथकाची तुकडीला गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. यामुळे अग्निशामक दलाच्या जवानांना मदतकार्य करताना अडथळा आला नाही. तत्काळ तीघा जखमींना मलब्याखालून सुरक्षित बाहेर काढण्यास यश आले. दोघे बेशुध्दावस्थेत होते. रुग्णवाहिकेतून तीघांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात नोेंद करण्यात आली आहे.

Web Title: The partial construction slab collapsed in Nashik, the tiger is serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.