स्मार्ट लाइटचे अर्धवट काम, ठेकेदाराला ८२ लाख रुपयांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 01:09 AM2021-09-17T01:09:32+5:302021-09-17T01:10:40+5:30

शहरात ९२ हजार स्मार्ट लाइट बसविण्याचे काम निर्धारित वेळेनंतर दहा महिने उलटल्यानंतरदेखील ८० टक्केच पूर्ण झाले आहे. त्यामुळे काम रखडवणाऱ्या ठेकेदाराला तब्बल ८२ लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. विशेष म्हणजे महापालिकेकडून यावर थेट कारवाई केली जात नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्यानंतर महापालिकेने धावपळ करून ही रक्कम कापून घेतल्याची कार्यवाही केली आहे.

Partial work of smart light, fine of Rs 82 lakh to the contractor | स्मार्ट लाइटचे अर्धवट काम, ठेकेदाराला ८२ लाख रुपयांचा दंड

स्मार्ट लाइटचे अर्धवट काम, ठेकेदाराला ८२ लाख रुपयांचा दंड

Next

नाशिक- शहरात ९२ हजार स्मार्ट लाइट बसविण्याचे काम निर्धारित वेळेनंतर दहा महिने उलटल्यानंतरदेखील ८० टक्केच पूर्ण झाले आहे. त्यामुळे काम रखडवणाऱ्या ठेकेदाराला तब्बल ८२ लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. विशेष म्हणजे महापालिकेकडून यावर थेट कारवाई केली जात नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्यानंतर महापालिकेने धावपळ करून ही रक्कम कापून घेतल्याची कार्यवाही केली आहे.

यासंदर्भात रंजन ठाकरे यांना महापालिकेचे विद्युत व यांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता यू.एम. धर्माधिकारी यांनी पत्राद्वारे या प्रकल्पाची माहिती दिली.

नाशिक महापालिकेने जून २०१७ मध्ये शहरात स्मार्ट लायटिंग प्रकल्प पीपीपी तत्त्वावर राबविण्याचे ठरवले. त्यानुसार ई-निविदा काढून ठेकेदार नियुक्त केला आहे. या प्रकल्पात मनपाची भांडवली गुंतवणूक नसून वीजबचतीच्या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक बचतीतून मनपास पाच टक्के मिळणार आहे. हा प्रकल्प सात वर्षे कंत्राटदाराकडे राहणार आहे. या काळात पथदीपांची देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी त्यांच्यावर आहे. हे काम वेळेत पूर्ण न झाल्याने महापालिका आयुक्तांनी ठेकेदार कंपनीस

सहा महिन्यांची मुदतवाढ दिली होती. शासन निर्देशानुसार ही विनादंड मुदतवाढ होती. मात्र, त्यानंतरही या कालावधीत कंत्राटदाराने ८० टक्के काम केले. आता वाढीव मुदतीला १० महिने उलटूनही हे काम रखडलेलेच आहे. त्याबद्दल कंत्राटदारास ८२.५ लाखांचा दंड करण्यात आल्याचे मनपाने दिलेल्या माहितीवरून उघड झाले आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजपची कोंडी करण्याचे डावपेच राष्ट्रवादीने आखले आहेत. एलईडी प्रकल्प रखडल्यासंदर्भात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित करून थेट शासनाकडे तक्रार केल्यानंतर यंत्रणेला जाग आली.

Web Title: Partial work of smart light, fine of Rs 82 lakh to the contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.