अडीचशे एस.टी.कर्मचारी होणार उपोषणात सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 06:31 PM2018-10-29T18:31:57+5:302018-10-29T18:34:14+5:30

वेतनवाढीच्या प्रमुख मागणीबरोबरच अनेक प्रलंबित प्रश्नांकडे एस.टी. महामंडळाचे लक्ष वेधण्यासाठी एस.टी. कामगार संघटनेने पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे.

participants,festivitie,employees,workars,st | अडीचशे एस.टी.कर्मचारी होणार उपोषणात सहभागी

अडीचशे एस.टी.कर्मचारी होणार उपोषणात सहभागी

googlenewsNext
ठळक मुद्देएस.टी. कामगार संघटना: पुन्हा एकदा आंदोलनाची हाक

नाशिक : कामगार संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एस.टी. महामंडळ प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्याचे आदेश दिले असले तरी मुंबईतील आझाद मैदानावर होणाºयाा संघटनेच्या उपोषणात नाशिक जिल्ह्यातील सुमारे अडीचशे कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. ज्या कर्मचाºयांची साप्ताहिक सुटी आहे असे राज्यभरातील कर्मचारी या उपोषणाला उपस्थित राहाणार असल्याचे समजते.
वेतनवाढीच्या प्रमुख मागणीबरोबरच अनेक प्रलंबित प्रश्नांकडे एस.टी. महामंडळाचे लक्ष वेधण्यासाठी एस.टी. कामगार संघटनेने पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. यापूर्वी संघटनेने गेल्या ८ व ९ जून रोजी कामबंद आंदोलन पुकारल्याने एस.टीची सेवा पुर्णपणे विस्कळीत झाली होती.ऐन दिवाळीतील आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच दमछाक झाल्याने प्रशासनाने या आंदोलनातील कर्मचाºयांवर कारवाई देखील केली होती. प्रशासनाने केलील्या एकतर्फी वेतनवाढीला संघटनेने हरकत घेत काही सुधारणा सुचविल्या होत्या. मात्र त्यावर महामंडळाकडून अद्यापही तोडगा काढला जात नसल्याने संघटनेने पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिलेली आहे.
बुधवार दि. ३० रोजी आझाद मैदान, मुंबई येथे संघटनेच्यावतीने उपोषण करण्यात येणार असून या उपोषणासाठी राज्यभरातील एस.टी. कर्मचारी सहभागी होणार आहेत. कामगार संघटना आणि प्रशासन यांच्यामध्ये वेतनवाढीच्या मुद्यावरून पेच निर्माण झालेला आहे. या संदर्भात औद्योगिक न्यायालयाने तोडगा काढण्याचे आदेश देऊनही प्रशासन चर्चा करीत नसल्याने वेतनवाढीबाबत अद्यापही समाधानकारक तोडगा निघू शकलेला नाही. संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी याप्रकरणी प्रशाासनाच्या भुमिकेविषयी नाराजी व्यक्त करून कर्मचाºयांच्या हितासाठी आंदालनात्मक भूमिका घेतल्याचे म्हटले आहे.

Web Title: participants,festivitie,employees,workars,st

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.