‘रक्ताचं नातं’ या अभिनव उपक्रमात सहभागी व्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:11 AM2021-06-28T04:11:35+5:302021-06-28T04:11:35+5:30
नाशिक : राज्यात केारोनामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने ‘लोकमत’तर्फे ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीचे ...
नाशिक : राज्यात केारोनामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने ‘लोकमत’तर्फे ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीचे औचित्यसाधून दि. २ ते १५ जुलै या कालावधीत ‘रक्ताचं नातं’ हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. विविध संस्था, संघटनांना ‘लोकमत’च्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करता येऊ शकते. शिबिर आयोजित करण्यास पुढाकार घेणाऱ्यांना ब्लड बँकेसह सर्व तांत्रिक बाबी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
प्रायोजक दीपक बिल्डर्स तसेच थिंक फाउंडेशन, विक्रम टी, योनो एसबीआय, व राज्य रक्तसंक्रमण परिषदेतर्फे (एसबीटीसी) यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित केले जात आहे. रक्ताला जात, धर्म, पंथ नसतो. रक्तदानाने माणुसकीचे नाते तयार होते. त्यामुळे रक्तदानाच्या या महायज्ञात आपण सहभागी व्हावे, असे आवाहन ‘लोकमत’तर्फे करण्यात आले आहे.
‘लोकमत’च्या रक्तदान महायज्ञात सहभागी होणाऱ्या संस्था किंवा संघटनांनी येत्या ३०जूनपर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. नाशिकमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यासाठी ८५३०६१९९९४ या क्रमांकावर संपर्क साधावा.
(सूचना: ‘रक्ताचं नातं’ लोगो वापरावा)