जीवनावश्यक वस्तूंची दुकानेवगळता अन्य व्यावसायिक बंदमध्ये सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 07:25 PM2021-03-14T19:25:46+5:302021-03-14T19:26:35+5:30
ब्राह्मणगाव : कोरोनाविषयी घ्यावयाची काळजी व उपाययोजना याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर ग्रामपंचायतीने गावातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता अन्य व्यावसायिक दुकाने बंद ठेवली. यास गावातील अन्य व्यावसायिकांनीही सहकार्य करत रविवारी दुकाने बंद ठेवली.

गावात रविवारी किराणा, हॉटेल, भाजीपाला, दवाखाने, मेडिकलवगळता अन्य व्यावसायिक दुकाने बंद होती. कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता सर्वांनी बाहेर पडल्यानंतर मास्क लावून फिरावे, असे आवाहन सरपंच किरण अहिरे, उपसरपंच बापू खरे यांनी केले आहे. रविवारी सर्व व्यापारी व जनतेच्या सहकार्याने कोरोना रोगाची साखळी तोडण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळून ब्राह्मणगाव बंद पाळण्यात आला.