संरक्षण साहित्याच्या उत्पादनात सहभागी व्हावे : व्ही. एम. डॉस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 01:00 AM2018-09-01T01:00:15+5:302018-09-01T01:00:51+5:30
मेक इन इंडिया अंतर्गत भारतीय नौदलाच्या वतीने आयात केल्या जाणाऱ्या सामग्रीस पर्याय म्हणून नौदलातील रशियन हेलिकॉप्टर्स व विमानांचे देशांतर्गत उत्पादन, संबंधित सेवा व व्यवस्थेसाठी नाशिकमधील उद्योगांना उत्पादनाच्या मोठ्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. देशांतर्गत उत्पादनामुळे आयातीद्वारे बाहेरच्या देशात जाणारी गंगाजळी रोखता येऊ शकेल. नाशिकमधील उद्योगांची उच्च क्षमता असून, संरक्षण साहित्याच्या उत्पादनात सहभागी व्हावे, असे आवाहन नौदलाचे रिअर अॅडमिरल व्ही. एम. डॉस यांनी केले आहे.
सातपूर : मेक इन इंडिया अंतर्गत भारतीय नौदलाच्या वतीने आयात केल्या जाणाऱ्या सामग्रीस पर्याय म्हणून नौदलातील रशियन हेलिकॉप्टर्स व विमानांचे देशांतर्गत उत्पादन, संबंधित सेवा व व्यवस्थेसाठी नाशिकमधील उद्योगांना उत्पादनाच्या मोठ्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. देशांतर्गत उत्पादनामुळे आयातीद्वारे बाहेरच्या देशात जाणारी गंगाजळी रोखता येऊ शकेल. नाशिकमधील उद्योगांची उच्च क्षमता असून, संरक्षण साहित्याच्या उत्पादनात सहभागी व्हावे, असे आवाहन नौदलाचे रिअर अॅडमिरल व्ही. एम. डॉस यांनी केले आहे. निमात आयोजित नेव्हल एव्हिएशन इंडस्ट्री इंटरॅक्शन या महत्त्वाकांक्षी उपक्र मात ते बोलत होते. डॉस यांनी पुढे सांगितले की, १९९० नंतरच्या मुक्त धोरणामुळे संरक्षण क्षेत्रातील देशांतर्गत उत्पादनास चालना मिळाली आहे.नाशिक हे एचएएल मिग विमान उत्पादनाचे प्रमुख केंद्र असून, नौदलातील रशियन बनावटीची विमाने, हेलिकॉप्टर्स व विमानांचे देशांतर्गत उत्पादन, संबंधित सेवा व व्यवस्थेसाठी नाशिकमधील उद्योगांना उत्पादनाच्या संधी निर्माण झाल्या आहेत. संरक्षण साहित्याच्या उत्पादनात सहभागी व्हावे, असेही त्यांनी सांगितले. कमांडर राजेश बाबू यांनी सांगितले की, देशांतर्गत उत्पादनाविषयी आढावा घेऊन उत्पादनक्षम साहित्याची यादी व अपेक्षति उत्पादन याची माहिती उपलब्ध करून दिली जाईल. दुसºया सत्रात नौदलातर्फे पॉवर पॉइन्ट प्रेझेंटेशनद्वारे देशांतर्गत उद्योगातून साहित्याची खरेदी, डिझाइन, डेव्हलपमेंट, देखभाल, असा संबंधित सेवा देशातून उत्पादित करून घेण्यात येणार असून, त्यांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे कमांडर एन. बालकृष्णन यांनी सांगितले. यावेळी कॅप्टन चेतन घाग, कमांडर जी. एस. संदीप, कमांडर जी. प्रभाकर आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक भाषणात निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी यांनी नाशिकमधील औद्योगिक वातावरण व उद्योगांची क्षमता याची माहिती दिली. मेक इन नाशिक समितीचे अध्यक्ष श्रीकांत बच्छाव यांनी स्वागत केले. यावेळी शशिकांत जाधव, कैलास अहेर, सुधाकर देशमुख, संजय सोनवणे, उदय रकिबे, मनीष रावळ, हर्षद ब्राह्मणकर, राजेश गडाख, श्रीपाद कुलकर्णी, कमलेश नारंग, तेजपाल बोरा, गौरव धारकर आदींसह उद्योजक उपस्थित होते.
निमाच्या पुढाकाराने उपक्रम
खासगी क्षेत्रातील उद्योगांना व्यवसायवाढीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नौदलातर्फे विविध उपक्र म राबविण्यात येत आहेत. नाशिकमध्ये निमाच्या पुढाकाराने प्रथमच हा उपक्र म राबविण्यात येत असून, नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राच्या वाटचालीस चालना मिळणार आहे. नाशिकच्या उद्योगांमध्ये संरक्षण सामुग्री उत्पादनाची क्षमता असल्याने या उद्योगांनी संरक्षण साहित्य उत्पादनात सहभाग घ्यावा. देशातून बाहेर जाणारी गंगाजळी रोखण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन डॉस यांनी केले आहे.