विघ्नहर्ता गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी व्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 12:43 AM2017-08-23T00:43:12+5:302017-08-23T00:43:17+5:30
सिन्नर : गणेश मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून मौल्यवान गणपतीची रक्षा तसेच मंडळ सुरक्षेची पावले उचलावीत. त्याचबरोबर जिल्हा पोलीसप्रमुखांच्या संकल्पनेतून राबविल्या जाणाºया विघ्नहर्ता गणेशोत्सव स्पर्धेत मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पोलीस उपविभागीय अधिकारी दीपक गिºहे यांनी केले.
येथील सिन्नर पोलीस स्टेशनच्या वतीने आगामी गणेशोत्सव, बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता समिती सदस्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी गिºहे बोलत होते. बैठकीच्या केवळ काही तास आधी झालेल्या पोलीस उपनिरीक्षक रमेश साळी यांच्या अपघाती निधनाने बैठकीवर दु:खाचे सावट होते. मात्र गणेशोत्सवास थोडेच दिवस शिल्लक असल्याने बैठक घेण्यात आली. बैठकीच्या प्रारंभी पोलीस उपनिरीक्षक साळी यांना श्रद्धांजली अर्पण करून प्रमुख विषयांवर चर्चा करण्यात आली. व्यासपीठावर आमदार राजाभाऊ वाजे, तहसीलदार नितीन गवळी, नगराध्यक्ष किरण डगळे, मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास, जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, गंगाधर वरंदळ, अॅड. राजेंद्र चव्हाणके यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. बैठकीत केवळ अत्यावश्यक विषयांवर चर्चा करण्यात आली. विसर्जन मिरवणूक ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत गतिमान ठेवावी, अशी सूचना आमदार राजाभाऊ वाजे यांनी केली. तसेच ठरावीक ठिकाणीच गणेश विसर्जन करावे, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. यावेळी शहरांतर्गत वाहतूक नियोजनविषयी काही मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या.
जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांनी निर्माल्य पाणीस्रोतात टाकून पाणी दूषित न करण्याची व पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी पोहण्यात तरबेज असणाºया व्यक्तींनी सहकार्यासाठी सिन्नर पोलीस स्टेशनमध्ये संपर्क करण्याचे आवाहन केले. नामदेव कोतवाल यांनी संपूर्ण गणेशोत्सवात अविरत बंदोबस्त ठेवणाºया पोलिसांना गणेश मंडळांनी आरतीचा मान द्यावा, अशी सूचना मांडली. हरिभाऊ तांबे यांनी यावर्षी मूर्तिदान संकल्पना राबविली जाणार असून, त्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. मनीष गुजराथी यांनी दरवर्षाप्रमाणे यावर्षीही गुलाल विरहित गणेशोत्सव साजरा करण्याचे आश्वासन दिले. येत्या गणेशोत्सवात या सर्व बाबींची अंमलबजावणी होईल, अशी अपेक्षा बैठकीत व्यक्त करण्यात आली. बैठकीस भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील केकाण, नगरसेवक शीतल कानडी, मालती भोळे, रामभाऊ लोणारे, डॉ. दिलीप गुरुळे यांच्यासह नगरसेवक, मंडळांचे पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.
मूर्तिदान संकल्पना राबविणार
हरिभाऊ तांबे यांनी यावर्षी मूर्तिदान संकल्पना राबविली जाणार असून, त्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. मनीष गुजराथी यांनी दरवर्षाप्रमाणे यावर्षीही गुलालविरहित गणेशोत्सव साजरा करण्याचे आश्वासन दिले. येत्या गणेशोत्सवात या सर्व बाबींची अंमलबजावणी होईल, अशी अपेक्षा बैठकीत व्यक्त करण्यात आली. बैठकीस भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील केकाण, नगरसेवक शीतल कानडी, मालती भोळे, रामभाऊ लोणारे, डॉ. दिलीप गुरुळे यांच्यासह नगरसेवक, गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.