कृषी धोरण योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:24 AM2021-03-04T04:24:33+5:302021-03-04T04:24:33+5:30
दरम्यान, दापूर कक्षेत येणाऱ्या दापूर, सोनेवाडी, धुळवड परिसरातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल सहा लाखांचा केला भरणा केला आहे. ...
दरम्यान, दापूर कक्षेत येणाऱ्या दापूर, सोनेवाडी, धुळवड परिसरातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल सहा लाखांचा केला भरणा केला आहे. दापूर कक्षेंतर्गत असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीकडून होत असलेली कटू कारवाही टाळण्यासाठी स्वत:हून शेतीपंप वीजबिल भरण्यास तयारी दर्शवून व प्रत्यक्ष भरणादेखील करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच दापूर कक्षेतील शेतकरी वीजबिलमुक्त होतील असे अपेक्षा दापूर कक्षेच्या वतीने करण्यात आली आहे.
याप्रसंगी भानुदास आव्हाड, निवृत्ती आव्हाड, मारुती आव्हाड, विश्वनाथ आव्हाड, रभाजी आव्हाड, राम सांगळे, दत्ताराम आव्हाड आदी शेतकऱ्यांनी सहा लाखांचा भरणा करून या योजनेत सहभाग नोंदविला आहे. दापूर कक्षेच्या अंतर्गत असणाऱ्या परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी या योजनेत जास्तीत जास्त लाभ घ्यावा. होणारी कटू कारवाई टाळावी तसेच आलेल्या पैशातून ३३ टक्के रक्कम ही त्याच ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक वीज वितरण व्यवस्थेची अपूर्ण कामे मार्गी लागणार आहे.