शिक्षकांचा संपात सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 01:25 AM2017-08-01T01:25:46+5:302017-08-01T01:25:57+5:30
महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक पात्र शाळा व महाविद्यालय कृती समितीचे अध्यक्ष प्रा. टी. एम. नाईक यांच्या निर्णयानुसार मंगळवारपासून (दि. १) मुंबईतील आझाद मैदान येथे राज्यव्यापी संप सुरु होणार असून, या आंदोलनात इगतपुरी तालुका विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीचे शिक्षक शाळा, महाविद्यालय बंद ठेऊन सहभागी होणार असल्याचे निवेदन तहसिलदार अनिल पुरे यांना देण्यात आले.
इगतपुरी : महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक पात्र शाळा व महाविद्यालय कृती समितीचे अध्यक्ष प्रा. टी. एम. नाईक यांच्या निर्णयानुसार मंगळवारपासून (दि. १) मुंबईतील आझाद मैदान येथे राज्यव्यापी संप सुरु होणार असून, या आंदोलनात इगतपुरी तालुका विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीचे शिक्षक शाळा, महाविद्यालय बंद ठेऊन सहभागी होणार असल्याचे निवेदन तहसिलदार अनिल पुरे यांना देण्यात आले. महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीद्वारे गेल्या १६ वर्षापासुन विनावेतन कार्य करणाºया शिक्षकांना वेतन मिळावे, तसेच सन-२०१४ मध्ये शासन निर्णयानुसार लागणारा नियतव्यय उपलब्ध करु न दिला नाही. आंदोलने करु नही शिक्षकांच्या अनुदानाबाबत शासन दिरंगाई करत आहे. उच्च माध्यमिक शाळांचे मुल्यांकनाचे ४०० प्रस्ताव १३ जुन २०१६ रोजी मुंबईकडे पाठविण्यात आले. मात्र दिरंगाई करण्याच्या हेतूने आधारकार्ड व इतर माहिती दिलेली असतानाही याच कारणाने पुणे आयुक्त व शिक्षण संचालक कार्यालयाकडे प्रस्ताव परत पाठविण्यात आले. े शिक्षक बांधव एकही रु पया पगार न घेता काम करत आहे. त्यांची आर्थिक स्थिती फार वाईट झाली असुन याचा परिणाम घरी भांडणे, रक्तदाब, हद्द्यविकार, आत्महत्या अशा घटना घडत आहे. यावेळी एस. एच. आडोळे, एस. व्ही. गुळवे, व्ही. जे. निकम, एस. आर. काळे, बी. बी. पाटील, एम. एल. आडोळे, निर्गस मनियार, एन. आर. गुळवे, ए. एस. पाटील, आर. एफ. मनियार, पी. एस. पाटील, अर्जुन कांरडा, जी. जी. पवार, ए. के. मनसुरी, आर. के. पाडेकर आदी उपस्थित होते.