पक्ष कार्यालये दिवस-रात्र व्यस्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 01:20 AM2019-10-12T01:20:01+5:302019-10-12T01:20:37+5:30
विधानसभा निवडणुकांसाठी अखेरचे दहा दिवस उरल्याने सर्वच पक्ष कार्यालयांमध्ये तयारीला वेग देण्यात आला असून बैठका, मतदारयाद्या तपासणी, प्रचारसाहित्य वाटप, विविध माध्यमांतून कार्यकर्ते, मतदारांशी संपर्क साधण्याचे सत्र अहोरात्र सुरू झाले आहे. कार्यालयीन प्रमुखांसह विविध पदाधिकाऱ्यांची उठबस कार्यालयांमध्ये होत असल्याने कार्यालये दिवस-रात्र व्यस्त झाल्याचे चित्र दिसत आहे.
नाशिक : विधानसभा निवडणुकांसाठी अखेरचे दहा दिवस उरल्याने सर्वच पक्ष कार्यालयांमध्ये तयारीला वेग देण्यात आला असून बैठका, मतदारयाद्या तपासणी, प्रचारसाहित्य वाटप, विविध माध्यमांतून कार्यकर्ते, मतदारांशी संपर्क साधण्याचे सत्र अहोरात्र सुरू झाले आहे. कार्यालयीन प्रमुखांसह विविध पदाधिकाऱ्यांची उठबस कार्यालयांमध्ये होत असल्याने कार्यालये दिवस-रात्र व्यस्त झाल्याचे चित्र दिसत आहे.
आपापल्या पक्षांच्या किंवा सहकारी पक्षांच्या उमेदवारांना आवश्यक ती सर्व मदत, सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम पक्षीय कार्यालयांमार्फत होत आहे. जिल्हाभरातील सर्व उमेदवारांसाठीचे पक्षीय प्रचार साहित्य हे पक्षीय कार्यालयांमध्ये जमा होऊन तिथूनच संबंधित उमेदवारांकडे वितरित केले जात आहे.
मनसे कार्यालयात सकाळचा प्रचार करून जमलेल्या पदाधिकाऱ्यांचे प्रचारसाहित्य वाटपासह मतदार याद्यांच्या तपासणीच्या कामाला प्रारंभ करण्यात आला होता. भाजप कार्यालयात मतदारयाद्यांचे नियोजन करून प्रत्यक्ष मतदानासाठीच्या बूथनिहाय जबाबदाºयांच्या निश्चिती प्रक्रियेला वेग देण्यात आला होता. शिवसेना कार्यालयातही मतदार याद्यांचे वर्गीकरण केले जात होते, तर राष्टÑवादी कार्यालयात कार्यालयीन प्रमुखांच्या उपस्थितीत प्रचार साहित्याच्या वितरणाच्या कामाला वेग देण्यात आला होता. कॉँग्रेस कार्यालयामध्ये सायंकाळच्या सभांचे नियोजन करण्यात कार्यकर्ते व्यस्त असल्याचे दिसून आले.
प्रचारासाठी उद्या अखेरचा रविवार
मतदानापूर्वीच्या दोन दिवस आधी अधिकृत प्रचार थांबवावा लागतो. त्यामुळे पुढील शनिवारीच प्रचाराच्या रणधुमाळीची सांगता होणार असल्याने उद्याचा एकमेव रविवार उमेदवारांना मिळणार आहे. अशा परिस्थितीत कुटुंबप्रमुखांसह मतदारांचे संपूर्ण कुटुंब घरी भेटू शकणार असल्याने उद्याच्या रविवारसाठीदेखील उमेदवार आणि पक्ष कार्यकर्त्यांकडून अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष नियोजन आखले जात आहे.
पक्ष कार्यालये दिवस-रात्र व्यस्त!
रणधुमाळी : एकच आठवडा उरल्याने प्रचाराला वेग