दोन वर्षांमध्ये पूर्ण होईल परभणीचा बाह्य वळण रस्ता

By Admin | Published: December 15, 2015 11:39 PM2015-12-15T23:39:11+5:302015-12-15T23:45:03+5:30

परभणी : कल्याण-निर्मल या राष्ट्रीय महामार्गाला परभणी शहरात बाह्य वळण रस्ता मंजूर झाला असून, त्याचा राजपत्रातही समावेश झाला आहे़

Parvati's outward turnover road will be completed in two years | दोन वर्षांमध्ये पूर्ण होईल परभणीचा बाह्य वळण रस्ता

दोन वर्षांमध्ये पूर्ण होईल परभणीचा बाह्य वळण रस्ता

googlenewsNext

परभणी : कल्याण-निर्मल या राष्ट्रीय महामार्गाला परभणी शहरात बाह्य वळण रस्ता मंजूर झाला असून, त्याचा राजपत्रातही समावेश झाला आहे़ कामाला योग्य गती मिळाल्यास दोन वर्षांमध्ये हे काम पूर्ण होऊ शकते, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी दिली़
शहराच्या विकासाचा घटक असलेल्या बाह्य वळण रस्त्याचे काम मागील काही वर्षांपासून रखडले होते़ या रस्त्याच्या प्रश्नावर शासकीय स्तरावरही एकत्रित माहिती उपलब्ध नसल्याने परभणी शहरातील पत्रकारांनी या प्रश्नी पुढाकार घेतला़ जिल्हाधिकारी राहुल महिवाल यांची भेट घेऊन रस्त्याच्या प्रश्नावर एकत्रित माहिती घेऊन बाह्य वळण रस्त्याच्या कामाला गती देण्याच्या उद्देशाने प्रयत्न सुरू केले़ त्याचाच एक भाग म्हणून बाह्य वळण रस्त्याच्याशी संदर्भात सर्व यंत्रणांचे अधिकारी आणि पत्रकारांची संयुक्त बैठक दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली़ या बैठकीत जिल्हाधिकारी राहुल महिवाल यांनी रस्त्या संदर्भात माहिती दिली़ ते म्हणाले, बाह्य वळण रस्त्याचे सर्वेक्षण भारतीय राजपत्रात प्रसिद्ध झाले आहे़ त्यामुळे आता या कामाला गती मिळणार आहे़ रस्त्यासाठी भुसंपादन हा महत्त्वाचा प्रश्न असून, भुसंपादनासाठी ३५० कोटी रुपयांची तरतूदही उपलब्ध आहे़ राजपत्रात समावेश झाल्याने जिल्हा प्रशासनातील भूसंपादन विभाग आणि राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांच्याकडून संयुक्त मोजणी केली जाणार असून, मोजणीनंतर प्रत्यक्षात भुसंपादनाच्या कामाला प्रारंभ होईल़ भुसंपादन कामासाठी योग्य गती राखली तर आगामी दोन वर्षांमध्ये बाह्य वळण रस्त्याचे काम पूर्ण होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला़ या बैठकीस जिल्हाधिकारी राहुल महिवाल यांच्यासह राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता कर्णेवार, जिल्हा भूसंपादन अधिकारी एस़एच़ मावची, पत्रकार अशोक कुटे, सुरेश जंपनगिरे, धनाजी चव्हाण, विशाल माने, प्रभु दिपके, अनिल दाभाडकर, विनोद कापसीकर, बंडू बनसोडे, सुमन उफाडे, आबासाहेब कड, मुंदडा आदींची उपस्थिती होती़ दरम्यान, राष्ट्रीय महामार्गाला परभणी शहरापासून बाह्य वळण रस्ता झाल्यानंतर शहराच्या विस्तारीकरणाचे आणि विकासाचे मार्ग मोकळे होणार आहेत़ त्यामुळेच पत्रकारांनी हा प्रश्न उचलून धरला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Parvati's outward turnover road will be completed in two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.