पाशा पटेल यांचा चांदवड तालुका दुष्काळी पाहणी दौरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 06:27 PM2018-10-09T18:27:41+5:302018-10-09T18:28:11+5:30
चांदवड तालुक्याच्या मंगरुळ व भरवीर या दुष्काळी भागाची पहाणी करण्यासाठी केंद्रीय कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी चांदवड तालुक्यातील मका, सोयाबीन, द्राक्ष, कांदा , टोमॅटो या पीकांची पहाणी केली
चांदवड- चांदवड तालुक्याच्या मंगरुळ व भरवीर या दुष्काळी भागाची पहाणी करण्यासाठी केंद्रीय कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी चांदवड तालुक्यातील मका, सोयाबीन, द्राक्ष, कांदा , टोमॅटो या पीकांची पहाणी केली यावेळी शेतकऱ्यांनी सोयाबीन व मक्याच्या खरेदीसाठी शासनाने त्वरीत चांदवड तालुका दुष्काळी जाहीर करावा व शेतकºयांच्या हाताला काम द्यावे अशी मागणी केली . तर यावेळी चांदवड तालुका दुष्काळी जाहीर करण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करुन मका व सोयाबीनच्या खरेदीबाबत संबधीतांशी बोलू असे आश्वासन पाशा पटेल यांनी शेतकºयांना दिले.
चांदवड तालुक्यात पावसाने जवळपास दोन महिन्यापासून दडी मारल्याने हाताशी आलेली पिके जळुन खाक झाली.सुरुवातीला जेमतेम पावसावर शेतकºयांनी मका, सोयाबीन भुईमुग, कांदा , टोमॅटो झेंडू व इतर पिकाची लागवड केली. पावसाळ्याच्या सुरुवातीला जेमतेम पाऊस पडला. त्यामुळे शेतकºयांची बी.बीयाणे लावून मोठ्या प्रमाणात हायब्रीड पिकांची खरेदी करुन शंभर टक्के पेरणी केली.पिके ऐन भरत आल्यानंतर जवळपास दोन महिन्यापासून निसर्गाने दडी मारल्याने पिकामध्ये दाने न भरल्यामुळे जळुन खाक झाली.उधार उसनवारी व खाजगी व्यक्तीकडून उसनवारी करुन पैसे घेऊन व प्रसंगी दाग दागिणे गहाण ठेऊन शेतकºयांनी पिके उभी करण्यासाठी भरमसाठ पैसा खर्च केला.परंतु शेतीमधुन एक रुपया देखील परत मिळेल अशी परिस्थिती राहीली नाही . शेतकºयांच्या विहीरी कोरड्या ठाक असून बोअरवेल देखील आटली आहेत. नदयाना व धरणामध्ये एक थेंब पाणी शिल्लक नाही. परतीचा पावसाळा देखील संपत आला.तरी पाऊस पडला नाही. याची खात्रीपटल्याने शेतकºयामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. कुंटूब चालविण्यासाठी पैसा नाही. पिण्यासाठी व जनावरांसाठी ही पाणी नाही. त्यामुळे पुढील काळ कसा घालवावा या विंवेचनेत शेतकरी सापडला आहे. चांदवड तालुक्यात कांदा हे पैशाचे नगदी पिक असून सुरुवातीच्या जेमतेम पावसावर लोकांनी आठ हजार रुपये एकराने कांदाची लागवड केली परंतु कांदा लावल्यानंतर कांद्याला पाणी देण्यासाठी विहीरी व बोअरवेल मध्ये थेंबभर पाणी नाही. त्यामुळे मोठ्या आशेने उभे केलेले कांद्याचे पीक जळून खाक होत आहे. याकडे त्वरीत लक्ष देऊ असे आश्वासन पाशा पटेल यांनी दिले.