पास्बाने आईने हिंद कमिटीतर्फे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 11:28 PM2020-01-05T23:28:54+5:302020-01-05T23:29:17+5:30
पास्बाने आईने हिंद कमिटी मालेगावतर्फे एनआरसी, सीएए कायद्याविरोधात दि. ३ ते १० जानेवारीपर्यंत सात दिवस धरणे आंदोलन संध्याकाळी सात ते दहा वाजेपर्यंत किदवाई रोडवर एटीटी हायस्कूल, शहिदों के स्मारकाजवळ सुरू आहे.
मालेगाव : पास्बाने आईने हिंद कमिटी मालेगावतर्फे एनआरसी, सीएए कायद्याविरोधात दि. ३ ते १० जानेवारीपर्यंत सात दिवस धरणे आंदोलन संध्याकाळी सात ते दहा वाजेपर्यंत किदवाई रोडवर एटीटी हायस्कूल, शहिदों के स्मारकाजवळ सुरू आहे.
संविधान बचाव देश बचाव, रिजेक्ट सीएए, एनआरसी या मागणीसाठी अध्यक्ष मौलाना अहमद रजा अजहरी, उपाध्यक्ष मौलाना नुरु ल हसन मिसभाई, सचिव अकील क्र ांती, फारूक फिरदोसी , कारी हारु न, मुक्ति नईम रझा मिसभाई, हाफिज अनिसुरहेमान रजिवी, नगरसेवक अतीक कमाल अहमद आदींच्या आंदोलन नेतृत्वाखाली सुरु आहे. आंदोलन सात दिवस चालणार असून सरकार जोपर्यंत हे विधायक परत घेत नाही तोपर्यंत आंदोलन वेगवेगळ्या पद्धतीने सुरू राहील. सरकारने वेळीच हा कायदा मागे घेण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी मौलाना नुरुल हसन मिसभाई यांनी केली. आंदोलनात नागरिक सहभागी झाले होते.