उर्दू पदविका परीक्षेत ४१ विद्यार्थी उत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 12:40 AM2018-12-16T00:40:08+5:302018-12-16T00:40:39+5:30

राज्याच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या उर्दू भाषेच्या पदविका अभ्यासक्रम परीक्षा नुकतीच ४१ विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण केली, तर अरबी भाषेच्या परीक्षेत २६ विद्यार्थ्यांनी यश मिळविले. उर्दू पदविका परीक्षेत राज्य गुप्त वार्ता विभागाचे उपआयुक्त सुनील कडासने हे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले.

Passed 41 students in Urdu Diploma Examination | उर्दू पदविका परीक्षेत ४१ विद्यार्थी उत्तीर्ण

उर्दू पदविका परीक्षेत ४१ विद्यार्थी उत्तीर्ण

Next
ठळक मुद्देमनुष्यबळ विकास मंत्रालय : राज्य गुप्त वार्ता विभागाचे सुनील कडासने प्रथम

नाशिक : राज्याच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या उर्दू भाषेच्या पदविका अभ्यासक्रम परीक्षा नुकतीच ४१ विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण केली, तर अरबी भाषेच्या परीक्षेत २६ विद्यार्थ्यांनी यश मिळविले. उर्दू पदविका परीक्षेत राज्य गुप्त वार्ता विभागाचे उपआयुक्त सुनील कडासने हे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
प्रत्येक भाषा आणि तिचे वैशिष्ट्ये वेगवेगळी आहे. भाषा ही स्वतंत्र असते तिचा कुठल्याही जाती धर्माशी अथवा पंथाशी संबंध नसतो. तिचे आपले एक वेगळेच अस्तित्व असते. त्यामुळे कोणीही कोणत्याही भाषेच्या प्रेमात पडू शकतो. अलीकडे दुर्दैवाने भाषेलाही राजकारणात ओढले गेले आहे.
सारडा सर्कलवरील नॅशनल उर्दू हायस्कूलला उर्दू भाषा पदविका अभ्यासक्रम केंद्राची मान्यता प्राप्त आहे. यावर्षी हा अभ्यासक्रम एकूण ९० विद्यार्थी शिकत होते.
त्यापैकी ५३ विद्यार्थी हे इस्लाम धर्मीय नव्हते, अशी माहिती संस्थेचे सचिव जाहिद शेख यांनी दिली. त्यापैकी ४१ उमेदवारांनी उर्दू पदविका अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण केली आहे. यामध्ये कडासने यांनी ८० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला, तर स्वानंद राजपूत (७९ टक्के), अब्दूल रहेमान शेख (७८ टक्के) गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. अरेबिक पदविका परीक्षेत हमीदोद्दीन शेख यांनी ९५ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच साजीद शेख, मुहम्मद अतिक यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला, अशी माहिती केंद्रप्रमुख लियाकत पठाण यांनी दिली. यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने गौरविण्यात आले. यावेळी अध्यक्ष हाजी बबलू पठाण, सहसचिव एजाज काझी, प्राध्यापक जमीर पठाण, मौलाना युनूस खान आदी उपस्थित होते. नवीन वर्षासाठी प्रवेश सुरू झाले आहे.
१४ वर्षांपासून पदविका अभ्यासक्रम
नॅशनल उर्दू महाविद्यालयाच्या आवारात चालविल्या जाणाºया या केंद्रात मागील १४ वर्षांपासून शेकडो विद्यार्थ्यांनी उर्दू, अरेबिक भाषेचे धडे गिरविले आहे. यामध्ये बिगर उर्दू भाषिकांचा समावेश अधिक आहे. केवळ उर्दू शिकली नाही तर ती बोलणे, लिहिण्याचेही ज्ञान उमेदवारांनी आत्मसात केले. अभ्यासक्रमासाठी लागणारी पाठ्यपुस्तके मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून मोफत पुरविली जातात. आतापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांनी उर्दू-अरेबिक भाषेचे ज्ञान घेतले आहे.

Web Title: Passed 41 students in Urdu Diploma Examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.