सटाण्यात दुकान फोडून कांदा बियाणे केली पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 03:32 PM2020-10-08T15:32:18+5:302020-10-08T15:32:18+5:30
सटाणा : सध्या कांदा बियाण्याची सर्वत्र टंचाई असल्यामुळे चढ्या दराने विक्र ी केले जात आहे. बियाण्याला सोन्याचे भाव आल्याने चोरट्यांनी थेट बियाणे विक्र ी केंद्रच फोडून ५० हजार रु पयांचे कांदा बियाणे लुटून नेले. हा प्रकार सटाणा शहरातील मालेगाव रस्त्यावरील न्यू देवराई अग्रो सर्व्हिसेस येथे गुरुवारी (दि.८) उघडकीस आला.

शहरातील मालेगांव रोडवरील प्रभात आॅईलमील समोर असलेल्या विशाल भामरे यांच्या दुकानचे शटर वाकवून चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास दुकानातील विक्र ीसाठी असलेले कांद्याचे बियाणे, शेतीपयोगी साहित्य व रोख रक्कम असा ५० हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.
याप्रकरणी सटाणा पोलिसात चोरट्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान कांद्याच्या बियाण्याची लुट केल्याने एकच खळबळ उडाली आहे.