रिक्षात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:48 AM2017-10-31T00:48:07+5:302017-10-31T00:48:12+5:30

बेशिस्त वाहतुकीला लगाम बसावा यासाठी वाहतूक शाखेकडून दंडात्मक कारवाई केली जात असल्याचे सांगण्यात येत असले तरी पंचवटी परिसरातील रिक्षाचालकांकडून सर्रासपणे वाहतुकीच्या नियमांची उघडपणे पायमल्ली होत आहे. परगावच्या प्रवाशांना देवदर्शन घडविणाºया रिक्षाचालकांकडून तर वाहतुकीच्या नियमांचा फज्जा उडविला जात आहे. विशेष म्हणजे वाहतूक शाखेतील कर्मचाºयांच्या डोळ्यादेखत ही परिस्थिती असली तरी कारवाई शून्य असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Passenger traffic more than capacity in the rickshaw | रिक्षात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक

रिक्षात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक

Next

पंचवटी : बेशिस्त वाहतुकीला लगाम बसावा यासाठी वाहतूक शाखेकडून दंडात्मक कारवाई केली जात असल्याचे सांगण्यात येत असले तरी पंचवटी परिसरातील रिक्षाचालकांकडून सर्रासपणे वाहतुकीच्या नियमांची उघडपणे पायमल्ली होत आहे. परगावच्या प्रवाशांना देवदर्शन घडविणाºया रिक्षाचालकांकडून तर वाहतुकीच्या नियमांचा फज्जा उडविला जात आहे. विशेष म्हणजे वाहतूक शाखेतील कर्मचाºयांच्या डोळ्यादेखत ही परिस्थिती असली तरी कारवाई शून्य असल्याचे चित्र दिसून येत आहे.  वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करावी याबाबत वाहतूक शाखेकडून प्रबोधन केले जात असले तरी गंगाघाट परिसरातील रिक्षाचालक वाहतूक शाखेच्या नियमावलीला केराची टोपली दाखवित आहेत. विशेष म्हणजे या रस्त्यावर वाहतूक शाखेच्या कर्मचाºयांची ये-जा असते. अनेकदा त्यांच्या डोळ्यादेखत रिक्षाचालक क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करतात मात्र वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी जास्तीचे प्रवासी वाहतूक करणाºया रिक्षाचालकांकडे डोळेझाक करीत असल्याचे दिसून येते.  सर्वसामान्य वाहनधारकाडे वाहनांची कागदपत्रे नसतील तर त्याला दंडाच्या नावाखाली अडवून आर्थिक लूटमार केली जाते. परंतु, दुसरीकडे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करून तसेच वाहतुकीच्या नियमांची उघडपणे पायमल्ली करून नियम तोडणाºयांना पाठीशी घालण्याचे काम वाहतूक शाखेकडूनच केले जात असल्याचा आरोप सर्वसामान्य नागरिकांनी केला आहे.

Web Title: Passenger traffic more than capacity in the rickshaw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.