बनावट नंबर प्लेट लावून प्रवाशी वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 11:40 PM2017-08-24T23:40:31+5:302017-08-25T00:04:16+5:30
शहरातून बनावट नंबर प्लेट लावून प्रवाशी वाहतूक करणाºया टेम्पो ट्रॅव्हलर्स सिटर बस पकडून जप्त करण्यात आल्या. ही कारवाई नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.
सटाणा : शहरातून बनावट नंबर प्लेट लावून प्रवाशी वाहतूक करणाºया टेम्पो ट्रॅव्हलर्स सिटर बस पकडून जप्त करण्यात आल्या. ही कारवाई नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.
सटाणा शहरात दोन टेम्पो ट्रॅव्हलर्स सिटर बस बनावट नंबर प्लेट (एमएच १५ डीसी ९०८१) व (एमएच १५ सीव्ही ९०९१) लावून प्रवाशी वाहतूक करत असल्याची माहिती नाशिक गुन्हे शाखेला मिळाली होती. पोलिसांनी दोन्ही बसेसबाबत चौकशी केली असता दोघांनी या बस अविनाश बबनराव देवरे (वय ३७, रा. शॉप नं. १, भावसार सोसायटी, गोरक्षनगर, आरटीओ कॉर्नर, नाशिक) यांच्या मालकीच्या असून, २१ जुलै २०१७ रोजी नाशिक येथील वकील नामदेव गिते यांच्याकडून नोटरी करून घेतल्या असल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी दोन्ही संशयितांकडे चौकशी केली असता त्यांनी दोन्ही बसेस आमच्या नावावर नसून बसमालक अविनाश देवरे यांनी मी बस तुमच्या नावावर करून देईल; पण तुम्ही सध्या बनावट नंबर वापरून प्रवासी वाहतूक करा, अशी कबुली दिली.