नाशिक-औरंगाबाद हायवेवरील खड्यांमुळे प्रवाशी झाले हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 06:57 PM2019-11-14T18:57:40+5:302019-11-14T19:00:23+5:30

खेडलेझुंगे : नाशिक औरंगाबाद हायवेला बोकडदरे येथील म्हसोबा महाराज मंदिर ते धारणगांव खडक फाट्यापर्यंत मोठ-मोठे खड्डे पडलेले आहे. त्यामुळे येथुन प्रवास करणे अत्यंत हालाखीचे झालेले आहे.

The passenger was disturbed by the rocks on the Nashik-Aurangabad highway | नाशिक-औरंगाबाद हायवेवरील खड्यांमुळे प्रवाशी झाले हैराण

नाशिक-औरंगाबाद हायवेवरील खड्यांमुळे प्रवाशी झाले हैराण

googlenewsNext
ठळक मुद्दे प्रवास करणे अत्यंत हालाखीचे झालेले आहे.

खेडलेझुंगे : नाशिक औरंगाबाद हायवेला बोकडदरे येथील म्हसोबा महाराज मंदिर ते धारणगांव खडक फाट्यापर्यंत मोठ-मोठे खड्डे पडलेले आहे. त्यामुळे येथुन प्रवास करणे अत्यंत हालाखीचे झालेले आहे.
सदर परिसरामध्ये अपघाती वळण व उंचवटा असल्याने रस्त्यावरील खड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहन चालकांची तारंबळ उडते. सदरील खड्यांमधुन वाहने जंप घेतात. त्यामुळे मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच सततच्या पावसामुळे खड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेले आहे. त्यामुळे वाहनांचे नुकसान सहन करावे लागत आहे.
अपघाती वळण आणि खड्डे यामुळे प्रवाशांचे मोठे नुकसान होत आहे. बोकडदरे येथील टेकड्यावर असलेले हिरवी गर्द झाडे, अपघाती वळणे आणि त्यातच या परिसरातील रस्त्याची खड्डे पडुन रस्त्याची झालेली चाळण यामुळे प्रवाशी मेटाकुटीला आली आहे.
वाहनांना वेग असल्याने खड्यातुन वाहने हेलकावे घेतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सदरील रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर बुजविणे गरजेचे आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याची तात्काळ दखल घेवुन रस्त्यांवरील खड्डे बुजवावे अशी शेतकरी, प्रवाशी व वाहन चालकांकडुन मागणी होत आहे.
मागील दुरु स्तीच्या वेळेस दुरु स्तीमध्ये खड्डे बुजविण्यासाठी मारलेले पॅचेसमुळे पुर्वीच्या खड्यांची साईज वाढलेली आहे. तसेचसख्याही वाढली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या कामकाजावरच प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.
मागील काही महिन्यांपुर्वी आचार संहीता असल्याने काम करता येत नाही म्हणुन सार्वजनिक बांधकाम विभागाने टिमकी वाजवित होती. परंतु आचार संहिता संपुन पंधारवाडा उलटुनही अद्याप पावेतो कामाला सुरवात केलेली नाही. त्यामुळे नाागरीकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
गावाची सुरवात होताच बेभान असलेल्या वाहनांच्या गतीवर नियंत्रण बसविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन नौताळे आणि म्हसोबा महाराज मंदिराजवळ तीन ठिकाणी अद्ययावत असलेले स्पीड ब्रेकर्स बसविण्यात आलेले होते. परंतु सदरचे स्पीड ब्रेकर्स हे निकामी ठरले. वाहनांच्या गतीमुळे सदरचे स्पीड ब्रेकर्स नष्ट झालेत. त्यामुळे सदरच्या ठिकाणची त्वरीत दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
 

Web Title: The passenger was disturbed by the rocks on the Nashik-Aurangabad highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.