प्रवाशांना लुटणारे भामटे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 01:21 AM2018-12-07T01:21:11+5:302018-12-07T01:21:52+5:30
मनमाड : रेल्वेस्थानकावर व धावत्या गाडीत प्रवाशांना भूलथापा देऊन लुटण्याच्या प्रयत्नात असलेल्या तीन जणांना रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने सापळा रचून शिताफीने पकडले आहे. त्यांच्यावर लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींकडून अन्य काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता रेसुब निरीक्षक के.डी. मोरे यांनी व्यक्त केली आहे.
मनमाड : रेल्वेस्थानकावर व धावत्या गाडीत प्रवाशांना भूलथापा देऊन लुटण्याच्या प्रयत्नात असलेल्या तीन जणांना रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने सापळा रचून शिताफीने पकडले आहे. त्यांच्यावर लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींकडून अन्य काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता रेसुब निरीक्षक के.डी. मोरे यांनी व्यक्त केली आहे.
मनमाड रेल्वेस्थानकावर रेसुब जवान मनीष कुमार सिंग सीसीटीव्ही कंट्रोल रूममध्ये ड्यूटीवर असताना त्यांना तीनजण संशयास्पदरीत्या प्लॅटफॉर्मवर फिरत असताना आढळून आले. त्यांनी तातडीने याची सूचना फलाटावर गस्त घालत असलेल्या आश्विन पटेल यांना दिली. पटेल व त्यांचे सहकारी आर. के. सिंग, ए.डी. देवरे, डी.के. तिवारी हे घटनास्थळी पोहचले व तिघांना ताब्यात घेतले.पैसे दुप्पट करण्याचे आमिषतीनही आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र तिथे उपस्थित असलेल्या प्रवाशांनी हे तीनही आरोपी आम्हाला जादूने पैसे डबल करून देण्याचे आमिष दाखवत असल्याचे सांगितले. त्यामुळे हे तीनही प्रवाशांना भूलथापा देऊन व आमिष दाखवून लूटमार करणारे असल्याचे निष्पन्न झाले. अय्युब मदारी, अफजल मदारी व जाकीर मदारी असे पकडण्यात आलेल्या आरोपींचे नाव असून, या तिघांना रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तिघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास रेल्वे पोलीस करत आहे. या तिघांना पोलिसांनी पकडल्यामुळे प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.मनमाड येथे प्रवाशांची लूटमार करणाऱ्या आरोपींसमवेत रेसुब कर्मचारी.प्रवाशांना लुटणारे भामटे गजाआड गुन्हा दाखल : रेल्वे सुरक्षा बलाची सतर्कता मनमाड : रेल्वेस्थानकावर व धावत्या गाडीत प्रवाशांना भूलथापा देऊन लुटण्याच्या प्रयत्नात असलेल्या तीन जणांना रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने सापळा रचून शिताफीने पकडले आहे. त्यांच्यावर लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींकडून अन्य काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता रेसुब निरीक्षक के.डी. मोरे यांनी व्यक्त केली आहे.
मनमाड रेल्वेस्थानकावर रेसुब जवान मनीष कुमार सिंग सीसीटीव्ही कंट्रोल रूममध्ये ड्यूटीवर असताना त्यांना तीनजण संशयास्पदरीत्या प्लॅटफॉर्मवर फिरत असताना आढळून आले. त्यांनी तातडीने याची सूचना फलाटावर गस्त घालत असलेल्या आश्विन पटेल यांना दिली. पटेल व त्यांचे सहकारी आर. के. सिंग, ए.डी. देवरे, डी.के. तिवारी हे घटनास्थळी पोहचले व तिघांना ताब्यात घेतले.पैसे दुप्पट करण्याचे आमिषतीनही आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र तिथे उपस्थित असलेल्या प्रवाशांनी हे तीनही आरोपी आम्हाला जादूने पैसे डबल करून देण्याचे आमिष दाखवत असल्याचे सांगितले. त्यामुळे हे तीनही प्रवाशांना भूलथापा देऊन व आमिष दाखवून लूटमार करणारे असल्याचे निष्पन्न झाले. अय्युब मदारी, अफजल मदारी व जाकीर मदारी असे पकडण्यात आलेल्या आरोपींचे नाव असून, या तिघांना रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तिघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास रेल्वे पोलीस करत आहे. या तिघांना पोलिसांनी पकडल्यामुळे प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.