बससेवा बंद असल्यामुळे प्रवाशांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2021 12:07 AM2021-11-09T00:07:34+5:302021-11-09T00:08:34+5:30
देवळा : रविवारी मध्यरात्रीपासून पुन्हा एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने देवळा बसस्थानकावर सोमवारी (दि. ८) दिवसभर सर्व बस सेवा बंद होती, यामुळे दिवाळी करून परतणाऱ्या महिला वर्गाचे तसेच शहराकडे परत जाणाऱ्या चाकरमान्यांचे खूपच हाल झाले.

बससेवा बंद असल्यामुळे प्रवाशांना नाइलाजाने खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. याची संधी साधत खासगी वाहनधारकांनी जास्तीचे भाडे आकारले. नाशिकचे ११५ रुपये भाडे असताना अक्षरशः अडीचशे ते तीनशे रुपये घेत आणि जास्त प्रवासी कोंबत खासगी वाहतूकदारांनी याचा फायदा उठवला.
देवळा बसस्थानकात थांबण्याऐवजी प्रवाशांनी पाच कंदील व मालेगाव नाक्यावर थांबणे पसंत केले. जे वाहन आले त्याला हात देत प्रवासी गयावया करत होते. यामुळे प्रवाशांच्या खिशाला चांगलीच झळ बसली. देवळा बसस्थानकावर शुकशुकाट दिसून आला.