गतिरोधक काढण्याची प्रवाशांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 05:06 PM2021-06-23T17:06:16+5:302021-06-23T17:06:52+5:30

वैतरणानगर : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे घोटी-वैतरणा रस्त्यावर अपघातांची मालिका सुरू असून, प्रवाशांना याचा भुर्दंड बसत आहे. कोरपगाव परिसरात जागोजागी सहा गतिरोधक तर वैतरणा परिसरात सात ते आठ गतिरोधक बसविलेले असल्याने अपघातात वाढ होत आहे.

Passengers demand removal of brakes | गतिरोधक काढण्याची प्रवाशांची मागणी

गतिरोधक काढण्याची प्रवाशांची मागणी

Next
ठळक मुद्देजागोजागी असलेल्या या गतिरोधकांमुळे सर्वच प्रवासी हैराण

वैतरणानगर : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे घोटी-वैतरणा रस्त्यावर अपघातांची मालिका सुरू असून, प्रवाशांना याचा भुर्दंड बसत आहे. कोरपगाव परिसरात जागोजागी सहा गतिरोधक तर वैतरणा परिसरात सात ते आठ गतिरोधक बसविलेले असल्याने अपघातात वाढ होत आहे.

अप्पर वैतरणा धरण पर्यटनासाठी प्रसिद्ध असून, या परिसरात पर्यटकांसह स्थानिक नागरिकही मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. नाशिक, मुंबईकडून येणाऱ्या पर्यटकांना जागोजागी असलेल्या गतिरोधकांचा अंदाज येत नसल्याने अपघात होत आहेत.
घोटी-वैतरणा रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. ग्रामीण भागातील नागरिकांना जवळची एकमेव घोटी बाजारपेठ असल्याने रोजच हजारो दुचाकीस्वार या मार्गाने प्रवास करतात. जागोजागी असलेल्या या गतिरोधकांमुळे सर्वच प्रवासी हैराण असून, वेळोवेळी संबधित विभागाला स्थानिक नागरिकांनी गतिरोधक कमी करण्याचेही सांगितले. मात्र अद्याप याकडे लक्ष देण्यात आलेले नाही.

तरी संबधित विभागाने गरजेचे गतिरोधक ठेवून अनावश्यक गतिरोधक काढून घेण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.

Web Title: Passengers demand removal of brakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.