लासलगाव आगाराच्या लालपरीला दोन महिन्यांपासून प्रवाशांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 10:14 PM2020-06-13T22:14:58+5:302020-06-14T01:31:05+5:30
लासलगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजूनही लासलगाव आगारातील बसेसला प्रवाशांची प्रतीक्षा कायम आहे. गेल्या दोन महिन्यांपासून लासलगाव बसस्थानकावर बसेस उभ्या असून, प्रवासीच येत नाही. आगारप्रमुख समर्थ शेळके यांच्यासह आगाराचे कर्मचारी सेवा सुरू करण्याच्या प्रयत्नात आहेत. बस- स्थानकावर दररोज २८८ बस फेऱ्या होतात.
लासलगाव : (शेखर देसाई)कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजूनही लासलगाव आगारातील बसेसला प्रवाशांची प्रतीक्षा कायम आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून लासलगाव बसस्थानकावर बसेस उभ्या असून, प्रवासीच येत नाही. आगारप्रमुख समर्थ शेळके यांच्यासह आगाराचे कर्मचारी सेवा सुरू करण्याच्या प्रयत्नात आहेत. बस- स्थानकावर दररोज २८८ बस फेऱ्या होतात. पंधरा हजार किलोमीटर अंतर लासलगाव बसस्थानकावरून प्रवाशांची ने आण होते. दररोज किमान पाच लाख रुपयांच्या तिकीट विक्र ीतून उत्पन्न होणाºया आगारात सर्व बसेस उभ्या आहेत. दि.२२ मार्चपासून दररोज पाच लाख रुपयांचे उत्पन्न बुडीत होऊन मार्चमध्ये चाळीस लाख, एप्रिल व मे महिन्यात लग्नसराईचे व प्रवास संख्या वाढून दीड कोटीपेक्षा अधिक, तर जून महिन्यात दि.१४ जूनपर्यंत सत्तर लाख रुपयांच्या उत्पन्नास मुकले आहे.
लासलगाव बस आगारातून दररोज २८८ फेऱ्यांद्वारे पंधरा हजार किलोमीटर बसेस धावत असून, याद्वारे दररोज पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळत होते. १५ एप्रिलपर्यंत सेवा बंद राहणार आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने २२ मार्चपासून एसटी महामंडळाची सेवा बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
----------------------
बस आगाराच्या वतीने गेले सात दिवस लासलगाव येथून चांदवड, मनमाड, निफाड, येवला व सिन्नर या गावांकरिता बसेस प्रवासी वर्गाकरिता लासलगावच्या बसस्थानकावर उभ्या आहेत, परंतु प्रवासी नाहीत अशी उलटी स्थिती आहे. गजबजून जाणाºया लासलगाव येथील बसस्थानकावर आता मालवाहतूक सेवाही उपलब्ध आहे.
----------------------------
लासलगाव बसस्थानकावरून निफाड, चांदवड, येवला व मनमाड तसेच लासलगाव परिसरातील काही खेडेगावात बस प्रवासी उपलब्ध होत असतील
तर त्यांना सोडण्यासाठी नियोजन आहे. एका बाकावर एकच प्रवासी, सॅनिरायझर्सचा वापर, मास्कसह प्रवासी प्रवास या अटींवर करू शकणार आहेत. प्रवाशांनी
बससेवेचा वापर करणे आवश्यक आहे.
- समर्थ शेळके, आगारप्रमुख