सिडको, अंबडला भावपूर्ण निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 12:35 AM2019-09-14T00:35:27+5:302019-09-14T00:35:50+5:30
ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत गणपती बाप्पा मोरयाचा गजरात सिडको, अंबड भागांतून भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला. सिडको भागातून १३,३७८ गणेशमूर्ती संकलन करण्यात आले, तर २१ टन निर्माल्य जमा करण्यात आले.
सिडको :ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत गणपती बाप्पा मोरयाचा गजरात सिडको, अंबड भागांतून भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला. सिडको भागातून १३,३७८ गणेशमूर्ती संकलन करण्यात आले, तर २१ टन निर्माल्य जमा करण्यात आले.
शिवाजी चौक, महाराणा प्रतापचौक,दत्तचौक,गणेश चौक, खोडेमळा, वृंदावन कॉलनी, विजयनगर, उत्तमनगर, पवननगर, त्रिमूर्तीचौक, शिवशक्ती चौक, खुटवडनगर, कामटवाडे, अंबड गाव येथील गणेशमंडळांनी ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका काढून गणरायाला भावपूर्ण निरोप दिला.
मनपाने सिडको भागात सहा ठिकाणी गणेशमूर्ती संकलन केंद्र उभारले होते. यात अश्विननगर येथील राजे संभाजी स्टेडियम येथे ७३८६, डे केअर शाळा येथे ४८४, गोविंदनगर येथे जिजाऊ वाचनालय ९४९, पवननगर जलकुंभ येथे २११६, कामठवाडे शाळा येथे १४२४, पिंपळगांव खांब बालदेवी नदी घाट येथे १०१९ याप्रमाणे १३,३७८ गणेशमूर्ती संकलन करण्यात आले.
खोडे मळ्यातील भैरवनाथ मित्रमंडळ, वृंदावन कॉलनी, गणेश मित्रमंडळ, सिडको वसाहत मित्रमंडळ, वंदे मातरम मित्रमंडळ, सिद्धिविनायक मित्रमंडळ, वक्र तुंड मित्रमंडळ, गणेश चौक युवक मंडळ, शुभम पार्क मित्रमंडळ, राजे सांस्कृतिक कला मंडळ, राजे छत्रपती प्रतिष्ठान, सिद्धी युवक मित्रमंडळ आदि गणेश मंडळ सहभागी झाले होते.
सिडकोत २१ टन निर्माल्य संकलन
जिजाऊ वाचनालय - २.५ टन संभाजी स्टेडियम - ८ टन,
मीनाताई ठाकरे शाळा, कामठवाडे - २.५ टन पवननगर जलकुंभ - ३.२ टन डे केअर स्कूल, चेतनानगर -२.५ टन पिंपळगांव खांब वालदेवी घाट प्रभाग - २.५टन एकूण २१.२ टन निर्माल्य संकलन करण्यात आले.
अशी माहिती विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे यांनी दिली.