पेस्ट कंट्रोल ठेका अनकंट्रोल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:42 AM2017-11-15T00:42:42+5:302017-11-15T00:48:48+5:30
डासांवरून रामायण : कंत्राट रद्द न केल्यास आरोग्याधिकाºयांना घरी पाठविणार नाशिक : शहरात डेंग्यूचा प्रकोप कायम आहे, परंतु पावसाळा संपला तरी डासांचा उपद्रव कायम आहे. १९ कोटी रुपयांचे पेस्ट कंट्रोलचे कंत्राट देऊनही कोणताही फरक पडलेला नाहीच, शिवाय कुठे फवारणी होत नाही. झाली तर औषधांऐवजी पाण्याची फवारणी केली जात असल्याचे एकेक आरोप करीत मंगळवारी नगरसेवकांनी संतापाला वाट मोकळी करून दिली. पेस्ट कंट्रोलच्या या ठेकेदाराला दोन नोटिसा बजावण्यात आल्या असून, आता तिसरी नोटीस देऊन तत्काळ घरी पाठवावेत अन्यथा आरोग्याधिकाºयांना घरी पाठविण्यात येईल, असा सज्जड दमच महापौर रंजना भानसी यांनी दिला आहे.
डासांवरून रामायण : कंत्राट रद्द न केल्यास आरोग्याधिकाºयांना घरी पाठविणार
नाशिक : शहरात डेंग्यूचा प्रकोप कायम आहे, परंतु पावसाळा संपला तरी डासांचा उपद्रव कायम आहे. १९ कोटी रुपयांचे पेस्ट कंट्रोलचे कंत्राट देऊनही कोणताही फरक पडलेला नाहीच, शिवाय कुठे फवारणी होत नाही. झाली तर औषधांऐवजी पाण्याची फवारणी केली जात असल्याचे एकेक आरोप करीत मंगळवारी नगरसेवकांनी संतापाला वाट मोकळी करून दिली. पेस्ट कंट्रोलच्या या ठेकेदाराला दोन नोटिसा बजावण्यात आल्या असून, आता तिसरी नोटीस देऊन तत्काळ घरी पाठवावेत अन्यथा आरोग्याधिकाºयांना घरी पाठविण्यात येईल, असा सज्जड दमच महापौर रंजना भानसी यांनी दिला आहे.
शहरात डेंग्यूचे थैमान कायम असून, त्याला कारणीभूत असलेले डेंग्यू डास कायम असल्याच्या तक्रारी आहेत. १९ कोटी रुपयांचा वार्षिक ठेका देऊनही डासनिर्र्मूलन होत नसल्याने महापौर रंजना भानसी यांनी तातडीची आरोग्य विभागाची बैठक आयोजित केली होती.
दुपारी स्थायी समितीच्या दालनात झालेल्या बैठकीस स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृह नेता दिनकर पाटील, आरोग्य व वैद्यकीय समितीचे सभापती सतीश कुलकर्णी, भाजपा गटनेता संभाजी मोरुस्कर आदी उपस्थित होते.
मालप्रॅक्टिस केल्यास असेच होणार...
महापालिकेचे ठेका घेताना ठेकेदार मालप्रॅक्टिस करतात आणि अशाप्रकारे ठेके दिल्यानंतर काम अशाच दर्जाची होणार असल्याचा आरोप सभापती डॉ. हेमलता पाटील यांनी केला. पेस्ट कंट्रोलच्या ठेक्यात औषधांचा वापर करताना गोंधळ असून, अवघे तीस ते पस्तीस टक्केऔषध असते, बाकी पाणी असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्मचाºयांच्या हाती स्क्रूड्रायव्हर
डास निर्मूलनासाठी कर्मचाºयांना फवारणीची औषधे मिळत नाही, अशी ओरड असतानाच त्याचे समर्थन करीत जीवशास्त्रज्ञ राहुल गायकवाड यांनी कर्मचाºयांना स्कू्र ड्रायव्हर दिल्याचे सांगितले. पावसाळा संपल्याने रस्त्याच्या कडेला किंवा छतावर पाणी साचत नाही तर घरातील फ्रीजच्या पाठीमागील बाजूस पाणी साचते त्यात डेंग्यू पसरवणाºया डासांची उत्पती होते, त्यामुळे कर्मचारी घरोघर जाऊन स्क्रूड्रायव्हरने अशाप्रकारचे फ्रीज तपासत असल्याचे सांगितले.
बैठकीस वैद्यकीय अधीक्षकांची दांडी
महापौरांनी घाईघाईने आरोग्य विभागाची बैठक घेतली असताना वैद्यकीय अधीक्षक डॉ. भंडारी यांनी मात्र बैठकीस दांडी मारली. ते प्रभारी आयुक्तांकडे गेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे महापौर भानसी नाराज झाल्या. त्यांनी भंडारी यांना त्वरित बोलविण्याचे आदेश दिले. परंतु मुख्य विषय संपल्यानंतरही ते उपस्थित नव्हते.