आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पाठीवर थाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 10:57 PM2020-07-12T22:57:18+5:302020-07-13T00:17:01+5:30
कोरोनाच्या महामारीत जनतेचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी पेठ तालुक्यातील आरोग्य विभागाचे आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी जीव धोक्यात घालून बजावलेल्या सेवेबद्दल पंचायत समितीच्या वतीने या कोरोनायोद्ध्यांचा सन्मान करत त्यांना कालबद्ध पदोन्नती देऊन पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.
पेठ : कोरोनाच्या महामारीत जनतेचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी पेठ तालुक्यातील आरोग्य विभागाचे आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी जीव धोक्यात घालून बजावलेल्या सेवेबद्दल पंचायत समितीच्या वतीने या कोरोनायोद्ध्यांचा सन्मान करत त्यांना कालबद्ध पदोन्नती देऊन पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.
पेठ तालुका तीन महिन्यांपासून कोरोनापासून दूर होता. मात्र शहरात लागण झाल्याने आरोग्य विभागाने तत्काळ उपाययोजना करत घरोघर सर्वेक्षण, आरोग्य तपासणी व उपचार करून कोरोना संक्रमणाची साखळी खंडित करण्यात यश मिळवले. राजबारी येथील आंतरराज्यीय तपासणी नाक्यावर चार महिन्यांपासून आरोग्य कर्मचारी सेवा बजावत आहे. गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांच्या हस्ते सन्मान करण्यात
आला. याप्रसंगी डॉ. मोतीलाल पाटील, बाळासाहेब चौधरी, बाळकृष्ण सोनार, रोहिदास जाधव, मधुकर आव्हाड आदी उपस्थित होते.
पेठ तालुक्यातील २८ आरोग्य कर्मचाºयांना कालबद्ध पदोन्नतीचा लाभ देण्यात आला असून, नाशिक जिल्ह्यातून पेठ तालुक्याचे सर्वाधिक प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये आरोग्य सहायक, आरोग्य सेवक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आदींचा समावेश आहे. कोरोनाकाळात प्रशासनाकडून पाठीवर थाप देऊन कोरोनाच्या लढाईसाठी बळ दिल्याची भावना या कर्मचाºयांनी व्यक्त केली.
चांदवड : मालेगावमध्ये सेवा दिल्यानंतर चांदवड येथे परतलेल्या डॉ. हितेश महाले यांच्यासह आरोग्य कर्मचाºयांचे स्वागत करण्यात आले. यावेळी निवासस्थानासमोर आकर्षक रांगोळी काढून फटाक्यांच्या आतषबाजी व पुष्पवृष्टी करत त्यांचे स्वागत करण्यात आले. प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे, उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी डॉ. हितेश महाले, डॉ. पुष्कर इंगळे यांचे स्वागत केले. डॉ. प्राची कापडणीस, डॉ. अश्विनी महाले, डॉ. गीता गुंजाळ, कल्पना आहेर, सुलोचना इंगळे आदींनी त्यांचे औक्षण केले. हॉस्पिटल कर्मचारी व डावखरनगर येथील नागरिकांनी त्यांचा सन्मान करून शुभेच्छा दिल्या. यावेळी नागरिकांनी शारिरिक अंतर राखत हा सोहळा पार पाडला.
बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांचा सन्मान
इगतपुरी : कोरोना विषाणूचा धोका वाढू नये तसेच नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी मालेगाव येथे कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाºयांसह वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचाºयांचा घोटी पोलीस ठाण्यात सन्मान करण्यात आला. कोरोना विषाणूंचा सामना करताना नागरिकांच्या आरोग्याचे हित जोपासण्यासाठी पोलीस, डॉक्टर यांचा महत्त्वाचा सहभाग राहिला आहे.
४कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मालेगाव शहरात चोख बंदोबस्त ठेवणारे पोलीस, डॉक्टर हे कोरोनायोद्धे असल्याचे गौरवोद्गार तहसीलदार परमेश्वर कासोळे यांनी याप्रसंगी काढले. यावेळी निवासी नायब तहसीलदार प्रवीण गोंडाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे उपस्थित होते. मालेगाव शहरात बंदोबस्तावर असलेले पोलीस उपनिरीक्षक विलास घिसाडी, आनंदा माळी, मोहित मोरे यांच्यासह घोटी ग्रामीण रु ग्णालयाचे प्रभारी डॉ. अविनाश गोºहे यांना सन्मानित करण्यात आले.