येवल्यात पतंगोत्सव धूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 06:38 PM2021-01-13T18:38:41+5:302021-01-13T18:40:26+5:30
येवला : शहरासह परिसरात मकरसंक्राती निमित्ताने पंतोगोत्सवाची धूम सुरू आहे.
येवला : शहरासह परिसरात मकरसंक्राती निमित्ताने पंतोगोत्सवाची धूम सुरू आहे.
मुलांसह तरुण, तरुणी व महिलांनी देखिल या उत्सवात सहभाग घेतल्याने तालुक्यात पतंगोत्सवाला विशेष रंगत येत आहे.
मकरसंक्रातीच्या पार्श्वभूमीवर भोगी, कर व संक्रांत असे सलग तीन दिवस येवलेकर या पंतगोत्सवाचा मनमुराद आनंद लुटतात. यंदा कोरोनाचे संकट असले तरी पंतगोत्सवातील उत्साह कमी झालेला नाही. येवल्यातील पंतगोत्सवातील विशेष वैशिष्ट असणारी आसारी लगतच्या राज्यांमध्येही पोहोचली आहे.
यंदा धातूच्या आसार्याही बाजारात दिसून आल्या. पंतग व दोरा खरेदीसाठी सगळ्यांचीच लगबग बाजारात होती. यंदा पंतग, मांजा, आसारी आदींच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसून आले.
बुधवारी (िद.१३) भोगी निमित्ताने सकाळपासून शहरातील प्रत्येक घरावरील गच्ची, टेरेस धाबे पतंगप्रेमींनी फुललेले होते. तर आकाशातही रंगीबेरंगी पतंगांची मोठी गर्दी झाली होती. ध्वनीक्षेपकावरून वाजणारी गाणी पंतोगत्सवात भर टाकत होती.