केटीएचएमच्या रसायनशास्र संशोधक पथकाला पेटंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:12 AM2021-06-02T04:12:31+5:302021-06-02T04:12:31+5:30
नाशिक : केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य तथा रसानयशास्त्राचे अभ्यासक डॉ. व्ही.बी. गायकवाड यांच्यासह डॉ.राजू काळे आणि त्यांच्या संशोधक पथकाला ...
नाशिक : केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य तथा रसानयशास्त्राचे अभ्यासक डॉ. व्ही.बी. गायकवाड यांच्यासह डॉ.राजू काळे आणि त्यांच्या संशोधक पथकाला ‘सोलेफिनिशीन ड्रग्ज’साठी पेटंट प्राप्त झाले आहे. हे औषध ‘ॲन्टिप्लाझमॉडिक्स ’ या गटातील असून, संशोधन पथकाने या औषधाचे पेटंट मिळविताना किमान खर्चात पर्यावरण अनुकूलनीय तसेच अधिक कार्यक्षम असणारी पद्धत विकसित केली आहे.
‘सोलेफिनिशीन ड्रग्ज’ हे ओव्हरॲक्टिव्ह, मूत्राशयाच्या उपचारासाठी वापरले जाते. मुख्यत: मधुमेहाचे रुग्ण, वयस्कर व्यक्ती आणि मूत्रपिंडाची व्याधी असलेल्या व्यक्तींमध्ये हा आजार आढळून येतो. ‘सोलेफिनिशीन ड्रग्ज’ मूत्राशयाच्या स्नायूंना स्थैल करते आणि लघवी नियंत्रणात आणून आजार बरा करण्यास प्रभावी ठरते. परिणामी वारंवार लघवीस जाणे तसेच अनियंत्रित लघवीसारखा त्रासही या औषधामुळे थांबवला जाऊ शकतो. केटीएचएमच्या संशोधन पथकाने विकसित केलेली ही नवीन पद्धत ही घातक रसायनांविरहित, उत्पादितेविरहित आणि कमी खर्चिक असल्यामुळे औद्योगिक स्तरावर उत्पादनासाठी अंमलात आणता येऊ शकते, असा दावा प्राचार्य डॉ. व्ही.बी. गायकवाड आणि डॉ. राजू काळे यांनी केला आहे. या संशोधन पथकात प्राचार्य डॉ. व्ही.बी. गायकवाड यांच्या डॉ. राजू काळे, प्रा. नितीन जाधव, प्रा. विक्रम ढेरे, प्रा. बाळकृष्ण काळे व प्रा. भाऊसाहेब मुनतोडे यांचाही समावेश आहे.
===Photopath===
010621\01nsk_40_01062021_13.jpg~010621\01nsk_42_01062021_13.jpg~010621\01nsk_43_01062021_13.jpg
===Caption===
‘सोलेफिनिशीन ड्रग्ज’ चे पेटंटमिळविणारे संशोधक ~‘सोलेफिनिशीन ड्रग्ज’ चे पेटंटमिळविणारे संशोधक ~‘सोलेफिनिशीन ड्रग्ज’ चे पेटंटमिळविणारे संशोधक