वणव्यापासून जंगल संरक्षणासाठी जनप्रबोधनाचा मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:16 AM2021-03-26T04:16:00+5:302021-03-26T04:16:00+5:30
हरसूल वनपरिक्षेत्रांतर्गत विविध गावांमध्ये वनसंपदा आजही टिकून आहे. या भागात साग वृक्षांसह विविध देशी प्रजातीची वृक्षराजी बहरलेली पहावयास मिळते. ...
हरसूल वनपरिक्षेत्रांतर्गत विविध गावांमध्ये वनसंपदा आजही टिकून आहे. या भागात साग वृक्षांसह विविध देशी प्रजातीची वृक्षराजी बहरलेली पहावयास मिळते. वाघेरा घाटापासून तर थेट गुजरात सीमेला लागून असलेल्या देवडोंगरा वनपरिमंडळापर्यंत मध्यम स्वरूपाचे जंगलाचे अस्तित्व बघावयास मिळते. एप्रिल, मे महिन्यात उन्हाची तीव्रता अधिक वाढलेली असते. यामुळे या भागातील जंगलांमध्ये मानवनिर्मित तसेच नैसर्गिक वणवे लागू नये, यासाठी नाशिक पश्चिम वनविभागाच्या वन वणवा प्रतिबंधक जनजागृतीपर अभियान राबविले जात आहे. याअंतर्गत वणव्यापासून आपल्या सभोवतालचे जंगल सुरक्षित कसे ठेवता येईल आणि समाजकंटक प्रवृत्तीवर लक्ष ठेवत त्यांच्यापासून जंगलांना कुठलाही धोका पोहोचणार नाही, यासाठी काय खबरदारी घ्यावी, याबाबत आदिवासी गाव, पाडे, वस्त्यांचा परिसर हरसूल वनपरिक्षेत्राच्या प्रभारी वनक्षेत्रपाल सीमा मुसळे यांच्यासह तेथील वनपाल, वनरक्षकांकडून पिंजून काढला जात आहे.
खरपडी (घोटविहिरा), पळशी, सारस्ते, पिंपळावटी, कुळवंडी, तिरांगण, ठाणापाडा, दलपतपूर आदी गावांमध्ये वणवा प्रतिबंध जनजागृतीपर उपक्रम घेत नागरिकांना वणव्यापासून जंगल संरक्षण कसे करावे, यासाठीच्या उपाययोजनांची माहिती तसेच वणव्यामुळे जंगलांची होणारी हानी आणि त्याचे आजूबाजूला राहणाऱ्या सजीवसृष्टीवर होणारे दुष्परिणामांविषयी वनविभागाकडून नागरिकांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या भागात जंगलाचे प्रमाण आहे, अशा सर्वच गावांमध्ये जाऊन वन अधिकारी, कर्मचारी पुढील काही दिवस ही मोहीम राबविणार असल्याचे मुसळे यांनी सांगितले.
---
फोटो आर वर २५हरसुल१/२ नावाने सेव्हआहे.
===Photopath===
250321\25nsk_43_25032021_13.jpg~250321\25nsk_44_25032021_13.jpg
===Caption===
वणव्याविषयी जनजागृती करताना वनरक्षक~वणव्याविषयी जनजागृती करताना वनरक्षक