पथनाट्यविषयक कार्यशाळा

By admin | Published: May 19, 2014 11:51 PM2014-05-19T23:51:16+5:302014-05-20T00:20:24+5:30

नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि लोकरंगभूमी यांच्या वतीने आयोजित पथनाट्यविषयक कार्यशाळेचे उद्घाटन कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यवाह लोकेश शेवडे यांच्या हस्ते करण्यात आले. दि. २३ मेपर्यंत कुसुमाग्रज स्मारकात सदर कार्यशाळा होणार आहे.

Pathantical Workshop | पथनाट्यविषयक कार्यशाळा

पथनाट्यविषयक कार्यशाळा

Next

नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि लोकरंगभूमी यांच्या वतीने आयोजित पथनाट्यविषयक कार्यशाळेचे उद्घाटन कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यवाह लोकेश शेवडे यांच्या हस्ते करण्यात आले. दि. २३ मेपर्यंत कुसुमाग्रज स्मारकात सदर कार्यशाळा होणार आहे.
नाशिकमध्ये पहिल्यांदाच पथनाट्यविषयक कार्यशाळा होत आहे. पथनाट्याच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक विषय परिणामकारकरीत्या मांडले जात असतात. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही काही राजकीय पक्षांनी पथनाट्याच्या माध्यमातून पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. पथनाट्याच्या प्रभावी माध्यमाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेत शाहीर संभाजी भगत व प्रवीण गांगुर्डे सहभागी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करणार आहेत. पहिल्या दिवशी प्रशिक्षणार्थींना नाट्यकलेचा इतिहास समजून सांगण्यात आला, तसेच काही खेळांच्या माध्यमातून अभिनय करून घेण्यात आला. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विश्वस्त विनायक जोशी, वकील विचार मंचाचे ॲड. बाबासाहेब नन्नावरे आदि उपस्थित होते.
 

Web Title: Pathantical Workshop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.