पाथरशेंबेच्या ‘त्या’ बहिणी कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 09:41 PM2020-06-03T21:41:59+5:302020-06-04T00:43:40+5:30
चांदवड : तालुक्यातील पाथरशेंबे येथील कोरोनाबाधित दोन्ही बहिणी उपचारानंतर पूर्णपणे बऱ्या झाल्या असून, त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. पाथरशेंबे येथील सातवर्षीय मुलगी व तिची १७ वर्षांची बहीण या दोघी गेल्या आठ दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या.
चांदवड : तालुक्यातील पाथरशेंबे येथील कोरोनाबाधित दोन्ही बहिणी उपचारानंतर पूर्णपणे बऱ्या झाल्या असून, त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.
पाथरशेंबे येथील सातवर्षीय मुलगी व तिची १७ वर्षांची बहीण या दोघी गेल्या आठ दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या. त्या ठाणे येथून पाथरशेंबे येथे आल्याने त्यांच्यावर चांदवड येथील कोविड सेंटरमध्ये उपचार करण्यात आले. त्या पूर्णपणे बºया झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती चांदवड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुशीलकुमार शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज ठाकरे यांनी दिली. आता चांदवड तालुक्यातील सर्व कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, कुंदलगाव येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील सात जणांचे आणि मुंबईशी संपर्क असलेल्या दुगाव येथील एका पोलिसाचा असे आठ जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, ते अहवाल प्रलंबित असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
------------------------------
चांदवड तालुक्याला दिलासा; सर्व अहवाल निगेटिव्ह
मनमाड येथील एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचे कुटुंबातील व मूळचे कुंदलगाव येथील एकूण सात व्यक्तींचे अहवाल बुधवारी (दि.३) प्राप्त झाले असून, ते निगेटिव्ह आले आहेत. दुगाव येथील एक पोलीस कर्मचाऱ्यांचा अहवालदेखील निगेटिव्ह आला असल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली. त्यामुळे चांदवड तालुक्याला दिलासा लाभला आहे.