पाथरे : १० नारळ, १५ सिल्व्हर झाडांचे नुकसान वीजवाहिनीच्या घर्षणाने डाळिंबबाग खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 12:35 AM2018-04-15T00:35:49+5:302018-04-15T00:35:49+5:30

पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे वीजवाहिन्यांमध्ये घर्षण होऊन वाहिनी तुटल्यामुळे दीड एकर डाळिंबबाग जळून खाक झाली, तर नारळाची दहा, सिल्व्हरची पंधरा झाडे जळाली.

Pathre: 10 coconut, 15 silver trees damages, Pomegranate borer with friction of TV channels | पाथरे : १० नारळ, १५ सिल्व्हर झाडांचे नुकसान वीजवाहिनीच्या घर्षणाने डाळिंबबाग खाक

पाथरे : १० नारळ, १५ सिल्व्हर झाडांचे नुकसान वीजवाहिनीच्या घर्षणाने डाळिंबबाग खाक

Next
ठळक मुद्दे नारळ, चिक्कू, सिल्व्हर आदी झाडांची बाग परिसरातील गवत जळून खाक झाले

पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे वीजवाहिन्यांमध्ये घर्षण होऊन वाहिनी तुटल्यामुळे दीड एकर डाळिंबबाग जळून खाक झाली, तर नारळाची दहा, सिल्व्हरची पंधरा झाडे जळाली. पाथरे खुर्द येथील सिंधूबाई रमेश जोरे, नीलेश जोरे यांच्या गट क्रमांक १६१ मध्ये डाळिंबाची बाग आहे. या बागेशेजारीच आणि साईतीर्थ दूध डेअरी परिसरात वीज वितरण कंपनीचे रोहित्र आहे. याच ठिकाणांवरील वीजवाहिनींचे घर्षण (शॉर्टसर्किट) होऊन तारा तुडल्या. त्यामुळे शुक्र वारी (दि. १३) सकाळी ११.३० वाजता रोहित्राजवळ ठिणग्या पडून वाळलेल्या गवताने पेट घेतला. जोरे यांचा बाग शेजारीच असल्याने संपूर्ण बाग जळून खाक झाली. यात जवळपास पाच लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. परिसरातच अरुण हांडे यांचे शेत असून, त्यांचे नारळ, चिक्कू, सिल्व्हर आदी झाडांची बाग आहे. यापैकी १० नारळाची, १५ सिल्व्हरची झाडेही जळाली. त्यांचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. साईतीर्थ डेअरीजवळ दोन एकर परिसरातील गवत जळून खाक झाले. सध्या हा प्रकल्प बंद अवस्थेत आहे. त्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नाही. परंतु जोरे आणि हांडे या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना आपली डाळिंबबाग आणि झाडे जळताना या शेतकºयांना पहावी लागली. या बागांवरच आपली आर्थिक स्थिती चांगली होईल, अशी आशा होती. परंतु डोळ्यासमोर उभी बाग जळत आहे हे पहाताना जोरे कुटुंबीय हतबल झाले. जोरे यांचे राहते घर, जनावरे, गोठा, चाºयानेही पेट घेतला असता; परंतु जवळच पाण्याच्या टाकीतून पाणी टाकून आग आटोक्यात आणली गेली. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. ही आग विझविण्यासाठी परिसरातील शेतकरी रावसाहेब आभाळे, रामनाथ घुमरे, अखिलेश जोरे, योगीता जोरे, चांगदेव आभाळे यांच्यासह परिसरातील शेतकºयांनी प्रयत्न केले. याबाबतची तक्रार संबंधित शेतकºयांनी वावी पोलीस ठाण्यात दिली आहे. पुढील तपास वावी स्टेशनचे कर्मचारी अजित जगधाने, नितीन जगताप हे करत आहे. पाथरे येथील वीज मंडळाचे अभियंता एच.एल. मांडवे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि याबाबत वरिष्ठांना तत्काळ परिस्थितीची माहिती कळविण्यात आली असल्याचे सांगितले. तलाठी के. एम.
परदेशी यांनीही परिस्थितीचा पंचनामा केला.

Web Title: Pathre: 10 coconut, 15 silver trees damages, Pomegranate borer with friction of TV channels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग