आमोदे येथील रुग्णाने कोरोनाला केले पराभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 08:52 PM2020-05-21T20:52:15+5:302020-05-21T23:23:16+5:30
साकोरा : नांदगाव तालुक्यातील आमोदे येथील ५८ वर्षीय कोरोनाबाधित रुग्ण अखेर दहा दिवसांच्या यशस्वी उपचारानंतर घरी परतल्याने काल नागरिकांनी तसेच बालकांनी थाळी वाजवून त्याचे स्वागत केले.
साकोरा : नांदगाव तालुक्यातील आमोदे येथील ५८ वर्षीय कोरोनाबाधित रुग्ण अखेर दहा दिवसांच्या यशस्वी उपचारानंतर घरी परतल्याने काल नागरिकांनी तसेच बालकांनी थाळी वाजवून त्याचे स्वागत केले.
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी संबंधित रुग्ण पाठ दुखत असल्याने चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. तेथे सलग तीन दिवस उपचार करूनदेखील आराम
मिळत नसल्याने, त्याला पुढील उपचारासाठी १० मे रोजी नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णालयात कोरोना चाचणी केली असता, अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याला त्वरित हलविण्याचे सांगण्यात
आले. पुढील उपचारासाठी त्याला जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यामुळे त्याच्या कुटुंबातील एकूण दहा जणांना साकोरा येथील आश्रमशाळेत चार दिवस कॉरण्टाइन करण्यात आले होते.
मात्र तिसऱ्याच दिवशी सर्वांची निगेटिव्ह चाचणी आल्याने सर्वांना घरी सोडण्यात आले होते. त्यानंतर संबंधित कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर तब्बल नऊ दिवस उपचार करण्यात येऊन शेवटी बुधवारी (दि. २०) त्याची कोरोना चाचणी
निगेटिव्ह आल्याने त्याला घरी सोडण्यात आले. या रुग्णाचे गावात आगमन होताच नागरिकांनी थाळीनाद करून स्वागत केले
अन् सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
--------------------------
कसबे सुकेणेत आरोग्यसेविकांचे स्वागत
कसबे सुकेणे : मालेगाव येथे कोरोना रु ग्णांची सेवा केलेल्या कसबे सुकेणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन आरोग्यसेविकांचे ग्रामस्थ व आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वागत केले. मालेगाव येथील कोरोना संसर्गबाधित रु ग्ण सेवेसाठी कसबे सुकेणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दोन सेविका आशा कर्डक, मयूरी गायकवाड यांची नियुक्ती झाली होती. चौदा दिवसांच्या सेवेनंतर या दोन्हीही सेविका कसबे सुकेणे येथे आल्यानंतर कसबे सुकेणे प्राथमिक
आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव
पाटील व कर्मचाºयांनी आणि ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी कसबे सुकेणेचे सरपंच अतुल भंडारे, धनंजय भंडारे, मौजे सुकेणेचे उपसरपंच सचिन मोगल, सुहास भार्गवे, किशोर कर्डक, मौजे सुकेणेचे
उपसरपंच सचिन मोगल, सोमनाथ भागवत आदी उपस्थित होते.