रुग्णाचा जिल्हा रुग्णालयात धुडगूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 12:52 AM2019-09-16T00:52:16+5:302019-09-16T00:52:34+5:30
जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाने अचानक रुग्णालयाचे स्वयंपाकगृह गाठले आणि तेथील खुर्च्यांची आदळआपट करत फु टलेल्या फरशीच्या तुकड्याने स्वत:लाही जखमी करून घेतल्याची घटना रविवारी (दि.१५) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली.
नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाने अचानक रुग्णालयाचे स्वयंपाकगृह गाठले आणि तेथील खुर्च्यांची आदळआपट करत फु टलेल्या फरशीच्या तुकड्याने स्वत:लाही जखमी करून घेतल्याची घटना रविवारी (दि.१५) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. हा प्रकार परिचारिकांच्या लक्षात येताच त्यांनी धाव घेऊन धुडगूस घालणाऱ्या त्या रुग्णाला धरून पलंगाला बांधून ठेवले.
याबाबत रुग्णालयाच्या सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, पंकज मारु ती पाटोळे, (30, रा. वडूज, जि. सातारा) हा रुग्ण पत्नीसोबत सातारा येथून रोजगाराच्या शोधात रविवारी सकाळी शहरात दाखल झाला. विशेष म्हणजे त्याने साताºयाहून नाशिकपर्यंतचा प्रवास पत्नीला घेऊन चक्क दुचाकीवरून केला. दुपारपासून पाटोळे अचानक असबंध बडबड करू लागल्यामुळे घाबरलेल्या पत्नीने उपचारासाठी सायंकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना परिचारिकेची नजर चुकवून पाटोळेने स्वयंपाकगृह गाठले. तेथील पुरवठा खोलीमध्ये असलेल्या टेबलची तोडफोड करत टेबलावरील कडप्पा फरशी जमिनीवर आपटून धुडगूस घातला.
दोरखंडाने बांधले
फरशीचा धारदार तुकडा घेत स्वत:च्या पोटावर व मानेवरही पाटोळे याने जखमा करून घेतल्या. यावेळी कर्मचारी व परिचारिकांनी धाव घेत त्याला धरून पुन्हा कक्षामधील पलंगावर आणून दोरखंडाने बांधून ठेवले. याबाबतची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य-चिकित्सकांना देण्यात आल्याचे व्यवस्थापकीय सूत्रांनी सांगितले.