ग्रामीण भागात रुग्णसंख्या घटतेय :सटाणा शहरात रुग्ण वाढ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:15 AM2021-05-14T04:15:20+5:302021-05-14T04:15:20+5:30

तालुक्यातील सटाणा शहरासह लखमापूर, ब्राम्हणगाव, नामपूर, जायखेडा, ताहाराबाद, मुल्हेर, विरगाव, आराई, सोमपूर या गावांमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढल्याने ही ...

Patient population declining in rural areas: Patient growth continues in Satana city | ग्रामीण भागात रुग्णसंख्या घटतेय :सटाणा शहरात रुग्ण वाढ कायम

ग्रामीण भागात रुग्णसंख्या घटतेय :सटाणा शहरात रुग्ण वाढ कायम

Next

तालुक्यातील सटाणा शहरासह लखमापूर, ब्राम्हणगाव, नामपूर, जायखेडा, ताहाराबाद, मुल्हेर, विरगाव, आराई, सोमपूर या गावांमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढल्याने ही गावे कोरोनाची हॉट स्पॉट ठरले होते. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून या गावांमध्ये स्थानिक पातळीवर लॉकडाऊनचे कठोर नियम लागू केल्याने लखमापूर, ब्राम्हणगाव नामपूर, जायखेडा, ताहाराबाद, सोमपूर या गावांमधील बाधित रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. मात्र सटाणा शहरासह मुंजवाड, उत्राणे या गावामध्ये बाधित रुग्ण संख्या कमी होण्याचे प्रमाण कमी प्रमाणात दिसून येते. दरम्यान कोळीपाडा, देवळाने, बहिराणे, सावरपाडा, नवेगाव या गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असून नियमांचे पालन न केल्यास रुग्ण संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आज ८९ कोरोना बाधित आढळले असून पैकी ५९ रुग्ण सटाणा शहरातील आहेत. शासनाने डांगसौंदाणे, नामपूर ग्रामीण रुग्णालयात कोविड रुग्णालय सुरू केले असून गेल्या दहा दिवसांपूर्वी ऑक्सिजन बेड फुल असल्याचे चित्र होते. बेडअभावी अनेक रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत होते. गेल्या सहा दिवसांपासून दोन्ही रुग्णालयात दहापेक्षा अधिक रुग्ण नसल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

Web Title: Patient population declining in rural areas: Patient growth continues in Satana city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.