रुग्णांचे हाल : स्ट्रेचरवरून नेताना येतात अडथळे; शवविच्छेदन कक्षाच्या वाटेवर खड्डे जिल्हा रुग्णालयात अडथळ्यांची शर्यत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 01:28 AM2017-12-13T01:28:45+5:302017-12-13T01:30:02+5:30

येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरून वाहनतळ हलविण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे; मात्र यासाठी उपाहारगृहापुढे रस्त्यावर लावलेल्या रेलिंगमुळे मुख्य प्रवेशद्वारावरून पाठीमागील बाजूस असलेल्या शवविच्छेदन कक्षाकडे जाण्याचा मार्ग बंद झाला आहे.

Patient Stretch: Stops to prevent obstacles; Khadda District Hospital obstacles race on the path of post mortem | रुग्णांचे हाल : स्ट्रेचरवरून नेताना येतात अडथळे; शवविच्छेदन कक्षाच्या वाटेवर खड्डे जिल्हा रुग्णालयात अडथळ्यांची शर्यत

रुग्णांचे हाल : स्ट्रेचरवरून नेताना येतात अडथळे; शवविच्छेदन कक्षाच्या वाटेवर खड्डे जिल्हा रुग्णालयात अडथळ्यांची शर्यत

googlenewsNext
ठळक मुद्देरस्त्याची प्रचंड दुरवस्थानागरिकांमध्ये संताप व्यक्त नातेवाईकांना अनेक अडचणींना तोंड

नाशिक : येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरून वाहनतळ हलविण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे; मात्र यासाठी उपाहारगृहापुढे रस्त्यावर लावलेल्या रेलिंगमुळे मुख्य प्रवेशद्वारावरून पाठीमागील बाजूस असलेल्या शवविच्छेदन कक्षाकडे जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया कक्षाच्या जवळून अंतर्गत रस्त्याने मृतदेह शवविच्छेदन कक्ष व शवगृहाकडे नेले जातात; मात्र यावेळी स्ट्रेचरवरून मृतदेह जमिनीवर पडण्याचा धोका संभवतो; कारण सदर रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे.
सदर रस्त्यावरील डांबर नाहीसे झाल्याने खडतर रस्त्यावरून स्ट्रेचर ढकलताना अधिक ताकद लावावी लागते, अशावेळी मृतदेह स्ट्रेचरवर प्रचंड प्रमाणात हलून खाली पडण्याची शक्यता निर्माण होते. जिल्हा रुग्णालयाच्या आवारात रस्त्यांचे डांबरीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्याची गरज आहे; मात्र याबाबत रुग्णालय प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे तीव्र नाराजी व्यक्त होत असून, शवविच्छेदनासाठी मृतदेह घेऊन जाताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे रस्त्याचे डांबरीकरण करणे गरजेचे असल्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्याचप्रमाणे पाठीमागील बाजूस काही पथदीप बंद असल्यामुळे अंधाराचे साम्राज्य वाढत आहे. रात्रीच्या वेळी अपघातांमध्ये मयत झालेल्या व्यक्तींचे मृतदेह शवगृह किंवा शवविच्छेदन कक्षात घेऊन जाताना तारेवरची कसरत करावी लागते. कारण रस्त्याची झालेली दुर्दशा आणि अंधार यामुळे जे कर्मचारी स्ट्रेचरवरून मृतदेह सुरक्षितरीत्या पोहचवितात ते कौतुकास पात्र आहे.
कारण सहसा मृत इसमांचे नातेवाइकांपैकीदेखील कोणी यावेळी धाडस करत नाही. शवविच्छेदन कक्षापर्यंत किंवा शवगृहापर्यंत जाण्यासाठी मृत व्यक्तीचे नातेवाईक स्ट्रेचर ढकलण्यास मदतदेखील करीत नाही. काही अपवाद वगळता असेच चित्र असते. जिल्हा शासकीय रुग्णालयात येणाºया रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.
स्ट्रेचरची चाके फिरतात कमी अन् आवाज जास्त
जिल्हा रुग्णालयात नवीन चांगल्या दर्जाचे स्ट्रेचर उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मोजके स्ट्रेचर जिल्हा रुग्णालयात असून, त्यांचीही दुरवस्था कमालीची झाली आहे. स्ट्रेचर ढकलताना त्यांची चाके फिरतात कमी अन् आवाज इतका प्रचंड असतो की आजूबाजूच्या लोकांना कानावर हात ठेवावा लागतो, तर विविध कक्षांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्याही मनात धडकी भरते. यामुळे स्ट्रेचरची दुरुस्ती करण्यापेक्षा नवीन चांगल्या दर्जाचे स्ट्रेचर प्रशासनाने खरेदी करावेत, अशी मागणी होत आहे. कारण स्ट्रेचरचा वापर जिल्हा रुग्णालयात अधिक होतो. सातत्याने रुग्णांचा वाढता ताण या रुग्णालयावर आहे.

Web Title: Patient Stretch: Stops to prevent obstacles; Khadda District Hospital obstacles race on the path of post mortem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.