जिल्हा रुग्णालयात ‘कोरोना’सदृश रुग्ण दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 10:24 PM2020-02-29T22:24:55+5:302020-02-29T22:29:55+5:30
नाशिक : शिक्षणासाठी इटलीला गेलेला मूळ चंद्रपूरचा रहिवासी विद्यार्थी शहरात बहिणीला भेटण्यासाठी आला असता त्यास सर्दी व थकवा जाणवू लागल्याने त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची वैद्यकीय तपासणी केली असता त्यास अॅलर्जिक सर्दी असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे; मात्र खबरदारीचा उपाय म्हणून शल्य चिकित्सकांच्या आदेशान्वये विशेष विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.

चीनमधून फैलावलेल्या ‘कोरोना’ या जीवघेण्या आजाराने विविध देशांमध्ये विषाणूग्रस्त रुग्णांची संख्या मोठी आहे. या पार्श्वभूमीवर भारतात सतर्कतेचा आदेश देण्यात आला आहे. इटलीत वास्तव्य करणारा विद्यार्थी इटलीवरून थेट नाशिक शहरात बहिणीक डे आला असता त्यास सर्दी, थकवा जाणवू लागला. मनपाच्या आरोग्य विभागाने त्याची तपासणी करून त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी त्यास संशयित रुग्ण म्हणून दाखल केले आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर सर्दीसोबत ताप, खोकला, कफ, श्वासोच्छवास घेण्यास अडथळा जाणवणे, आदी लक्षणे आढळून येतात. सध्या परदेशांमधून भारतात परतणाऱ्या रुग्णांना त्रास जाणवल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता त्या रुग्णाची वैद्यकीय सूत्रांकडून तत्काळ उपचार व उपाययोजना क रण्याचे आदेश सरकारी यंत्रणांना देण्यात आले आहे.दाखल रुग्ण हा कोरोनासदृश संशयित आहे. विषाणूची लागण झाल्याचे अद्याप स्पष्ट नाही; त्याचे नमुने पुणे प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविण्यात आले आहे. तो इटलीत वास्तव्यास असल्यामुळे खबरदारी म्हणून विशेष कक्षात ठेवण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
- डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्य चिकित्सक