बालनिरिक्षणगृहाच्या पाटील, देसले यांचा जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 06:35 PM2018-08-24T18:35:42+5:302018-08-24T18:37:52+5:30
नाशिक : तक्रारदाराकडून कॅरमबोर्डची लाच घेताना मंगळवारी (दि़२१) रंगेहाथ पकडण्यात आल्यानंतर न्यायालयीन कोठडीत असलेल्या बाल निरीक्षणगृहाच्या अधीक्षक नलीनी पाटील व लिपिक प्रशांत देसले यांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने शुक्रवारी (दि़२४)फेटाला़ या जामीन अर्जावर बुधवारी (दि़२९) सुनावणी होणार असून तोपर्यत या दोघांचाही मुक्काम कारागृहात असणार आहे़
नाशिक : तक्रारदाराकडून कॅरमबोर्डची लाच घेताना मंगळवारी (दि़२१) रंगेहाथ पकडण्यात आल्यानंतर न्यायालयीन कोठडीत असलेल्या बाल निरीक्षणगृहाच्या अधीक्षक नलीनी पाटील व लिपिक प्रशांत देसले यांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने शुक्रवारी (दि़२४)फेटाळला. या जामीन अर्जावर बुधवारी (दि़२९) सुनावणी होणार असून तोपर्यत या दोघांचाही मुक्काम कारागृहात असणार आहे़
तक्रारदाराचा मुलास बाल न्यायमंडळाच्या आदेशाने उंटवाडीतील बालनिरीक्षणगृहात दाखल करण्यात आले होते़ या मुलाचा बाल न्यायमंडळ कोटार्तून जामीन करून घेण्यासाठी बालसुधारगृह अधीक्षक यांच्याकडून पीओ लेटर देण्याकरिता व जामीन मिळाल्यानंतर सहकार्य करून मुलास सोडण्यासाठी अधीक्षका पाटील व लिपिक देसले यांनी कॅरमबोर्डची मागणी केली होती़ याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली होती़
या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि.२१) सापळा रचून पडताळणी केली असता अधीक्षक पाटील व लिपिक देसले यांनी तक्रारदाराकडे लाचेच्या स्वरूपात कॅरमबोर्डची मागणी केली़ तसेच निरीक्षणगृहात तक्रारदाराकडून कॅरमबोर्ड स्वीकारला असता त्यांना अटक करण्यात आली़ या दोघांनाही बुधवारी न्यायालयात हजर करण्यात केल्यानंंतर न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या दोघांनाही शुक्रवारी जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला होता़