पाटीलनगर-बडदेनगर रस्ता भूसंपादनाचा प्रस्ताव तहकूबच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:11 AM2021-06-29T04:11:41+5:302021-06-29T04:11:41+5:30

नाशिक- सिडकाे विभागातील पाटीलनगर ते बडदेनगर रस्त्यासाठी भूसंपादन करण्यास स्थायी समितीने स्थगिती दिली आहे. हा रस्त्यासाठी भूसंपादनाचा ...

Patilnagar-Baddenagar road land acquisition proposal tahkubach | पाटीलनगर-बडदेनगर रस्ता भूसंपादनाचा प्रस्ताव तहकूबच

पाटीलनगर-बडदेनगर रस्ता भूसंपादनाचा प्रस्ताव तहकूबच

Next

नाशिक- सिडकाे विभागातील पाटीलनगर ते बडदेनगर रस्त्यासाठी भूसंपादन करण्यास स्थायी समितीने स्थगिती दिली आहे. हा रस्त्यासाठी भूसंपादनाचा प्रस्ताव मंजूर झाल्याची चर्चा पसरल्यानंतर भाजप सदस्यांच्या विराेधामुळे हा प्रस्तावच मंजूर केला नसल्याचा निर्वाळा स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी दिला आहे.

स्थायी समितीच्या या पूर्वीच्या बैठकीत या संदर्भात विषय गाजला होता. महापालिकेत गेल्या वर्षीपासून आरक्षित भूखंडांचे भूसंपादन वाटाघाटीद्वारे केले जात आहे. त्यामुळे त्यात जिल्हाधिकारी कार्यालयाला निवाड्यासाठी भराव्या लागणाऱ्या सुमारे २० ते ३० टक्के निधीची बचत होत आहे. त्यामुळे आता महापालिकेमार्फतच भूसंपादनाची प्रक्रिया वाटाघाटीने करावी अशी मागणी नगरसेवकांकडून होत आहे. अशातच, पाटीलनगर ते बडदेनगर या रस्त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवाड्यासाठी सुमारे ७ काेटी रुपयांचा निधी देण्यापेक्षा महापालिकेमार्फत भूसंपादन करावे, अशी मागणी भाजपचे याेगेश हिरे, हिमगाैरी आहेर, रंजना भानसी, मुकेश शहाणे आणि प्रतिभा पवार यांनी केली हाेती. त्यामुळे सभापती गिते यांनी हा विषय तहकूब केला होता.मात्र, हा विषय मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात येऊ लागल्याने काही नगरसेवकांनी सभापती गिते यांना विचारणा केली. या वादग्रस्त विषयाबाबत

नगररचना विभागाने स्पष्टीकरण द्यावे असे सभापती गिते यांनी आदेशित केले होते. मात्र, या विभागाकडून स्पष्टीकरण आलेले नसताना हा विषय

मंजूर का केला असा प्रश्न नगरसेवकांनी केल्यानंतर सभापती गिते यांनी असा काेणताही विषय मंजूरच केला नसल्याचे सांगितले.

Web Title: Patilnagar-Baddenagar road land acquisition proposal tahkubach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.