विचारक्र ांती वाचनालयाने भागवली पाटोळे गावाची तहान !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 12:13 AM2019-04-23T00:13:33+5:302019-04-23T00:13:50+5:30
नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील जाखोरी गावच्या विचारक्रांती वाचनालयाच्या माध्यमातून जलदानमित्र या अभिनव उपक्र माद्वारे सिन्नर तालुक्यातील पाटोळे गावची तहान भागविण्याचा प्रयत्न केला आहे.
एकलहरे : नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील जाखोरी गावच्या विचारक्रांती वाचनालयाच्या माध्यमातून जलदानमित्र या अभिनव उपक्र माद्वारे सिन्नर तालुक्यातील पाटोळे गावची तहान भागविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांंच्या या उपक्र माचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सिन्नर तालुक्यातील दुष्काळ दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे चित्र सध्याच्या परिस्थितीवरून दिसत आहे. गेल्या चार-पाच वर्षांत एकदाही मुबलक पावसाळा झाला नसल्याने परिसरात विहिरी व कूपनलिकांनी तळ गाठला आहे. शासनाने या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा चालू केलेला असूनही ते पाणी तेथील ग्रामस्थांना पुरेसे ठरत नाही. याबाबत जाखोरी येथील विचारक्रांती वाचनालयाने पुढाकार घेऊन या दुष्काळी भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी जलदानमित्र हा उपक्र म राबविला आहे. या भागातील दुष्काळ निवारण्यासाठी आठवड्यातून एकदा सर्व मित्रांनी मिळून दुष्काळी भागाला एक टँकर पिण्याचे पाणी देण्याची अभिनव संकल्पना या उपक्र माद्वारे अंमलात आणली आहे. हा उपक्र म यशस्वी करण्यासाठी विचारक्र ांती वाचनालयाच्या वतीने देवीदास राजपूत व सुहास खाडे यांनी नुकतेच पाटोळे या ठिकाणी जाऊन पिण्याच्या पाण्याचा टँकर दिला आहे. यावेळी पाटोळेचे उपसरपंच रामहरी खताळे, मेघराज अव्हाड, गोरख कराड, संदीप खताळे, विनायक सांगळे, शिवाजी कराड, देवीदास कराड, नंदकिशोर कराड, रतन कराड, निवृत्ती कराड, विलस नागरे, विलास सांगळे, स्वप्नील घुगे, मनीषा सांगळे, ललीताताई कराड आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
जाखोरी येथील विचारक्र ांती वाचनालयाने राबविलेला जलदानमित्र उपक्र म खरच आमच्यासाठी मौल्यवान स्वरूपाचा आहे. आमची शासनाकडे विनंती आहे की आमच्या भागात टँकरची संख्या अजून वाढविण्यात यावी व अशाप्रकारचे सामाजिक उपक्र म राबविण्याऱ्या संस्थांनी आमच्या भागात विशेष लक्ष द्यावे.
- रामहरी खताळे, उपसरपंच, पाटोळे
आम्हा महिलांसाठी पाणीप्रश्न हा अतिशय गंभीर बनला जात असून, केवळ माणसांनाच नाही जनावरांनाही पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. जाखोरी येथील विचारक्र ांती वाचनालयाने आम्हा महिलांना या उपक्र माद्वारे सुखद अनुभव दिला आहे.
- ललिता कराड, महिला ग्रामस्थ, पाटोळे