पुण्याच्या निर्मलाताई अभ्यंकर ‘सुशीला’ पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 12:43 AM2017-07-30T00:43:47+5:302017-07-30T00:44:19+5:30

उद्योगिनी महिला नागरी पतसंस्थेतर्फे दिला जाणारा यंदाचा ‘सुशीला’ पुरस्कार पुणे येथील उद्योजिका निर्मलाताई अभ्यंकर यांना महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

paunayaacayaa-nairamalaataai-abhayankara-sausailaa-paurasakaaraanae-sanamaanaita | पुण्याच्या निर्मलाताई अभ्यंकर ‘सुशीला’ पुरस्काराने सन्मानित

पुण्याच्या निर्मलाताई अभ्यंकर ‘सुशीला’ पुरस्काराने सन्मानित

Next

नाशिक : उद्योगिनी महिला नागरी पतसंस्थेतर्फे दिला जाणारा यंदाचा ‘सुशीला’ पुरस्कार पुणे येथील उद्योजिका निर्मलाताई अभ्यंकर यांना महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
गंगापूररोडवरील शंकराचार्य संकुलाच्या सभागृहात येथे शनिवारी (दि.२९) सायंकाळी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी मनोगत व्यक्त करताना अभ्यंकर यांनी सांगितले की, आपण ठरविले तर काहीही करू शकतो. निश्चय, प्रयत्नात सातत्य, चिकाटी आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी असली पाहिजे. टाइमपास म्हणून सुरू केलेला हलव्याचे दागिने बनवण्याचा व्यवसाय आज पैसा व प्रतिष्ठा मिळवून देत असून, आपल्याबरोबर १० कुटुंबांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून देणारा ठरला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. वयाच्या ८० व्या वर्षी असे काहीतरी करू शकल्याचा अभिमान वाटत असल्याचेही त्यांनी नमूद केले. आपल्या हलव्याच्या दागिन्यांमुळे जगभरातून पसंतीची पावती मिळत असून, महिलांनी जिद्दीने स्वत:च्या पायावर उभे राहिल्यास यश नक्कीच मिळते. स्वत:तील कलांचा शोध घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. प्रास्ताविक योगीता शेटे यांनी केले. सूत्रसंचालन ज्योती म्हात्रे, शैलजा खोडके यांनी केले. याप्रसंगी प्रबोधिनी ट्रस्टच्या रजनी लिमये, भारती बागुल, मणिबेन पटेल, माजी आमदार निशिगंधा मोगल, वैशाली वैशंपायन, ज्योती कारखानीस, अनघा फेगडे, वृषाली मोरकर, सरोज तासखेडकर, सुमेधा पंडित आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: paunayaacayaa-nairamalaataai-abhayankara-sausailaa-paurasakaaraanae-sanamaanaita

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.